नंदुरबार जिल्ह्यात दोन रूग्णांचा मृत्यू
नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात दोन रूग्णांचा मृत्यू

पाच जण करोनामुक्त

Rajendra Patil

नंदुरबार | प्रतिनिधी | Nandurbar

येथे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हयात करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २२ झाली आहे.

दरम्यान, आज जिल्हयातील पाच रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे नवे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यात आंबेडकरचौक नंदुरबार येथील २७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्याला नाशिक येथून नंदुरबारला हलविण्यात आले आहे. तसेच आष्टे ता.नंदुरबार येथील ७० वर्षीय महिलेला काल रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तीचा रात्रीच मृत्यू झाला. तीचा करोना अहवाल आज पॉझिटीव्ह आला.

तसेच नंदुरबार येथील जुनी भोई गल्लीतील ६० वर्षीय पुरुषाचा देखील आज मृत्यू झाला. सदर इसमाला दि.१७ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हयात करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २२ झाली आहे.

दरम्यान, जिल्हयातील पाच जण करोनामुक्त झाले आहेत. यात नंदुरबार येथील देसाईपुरा, रायसिंगपूरा, तेलीवाडा तसेच मंदाणे ता.शहादा व माळीवाडा ता.तळोदा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना आज जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्हयात एकुण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४३० झाली आहे. त्यापैकी २५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २२ जणांचा मृत्यू झाला असून १३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com