तळोदा येथे वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

तळोदा येथे वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

मालकाला साडे चार लाखाच्या दंडाची नोटीस

सोमावल | Somaval वार्ताहर -

बेकायदेशीर वाळू वाहतूक Illegal sand transportation करणारे दोन डंपर जप्त करण्यात आले असून मालकाला ४ लाख ६२ हजाराची दंडात्मक नोटीस बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार गिरीश वाखारे Tehsildar Girish Wakhare यांनी दिली.

गुजरातमधील तापी नदीवरून वाळू वाहतूक करणार्‍या दोघा डंपरांना मंगळवारी नायब तहसीलदार रामजी राठोड, तलाठी राजेश पवार, अनिल पाटील यांच्या पथकाने हातोडा रस्त्यावर म्हणजे तळोदा शहराच्या हद्दीत पकडले. \

सदर डंपर चालकाकडून महाराष्ट्राची गौण खनिज वाहतुकीची रॉयल्टी विचारली असता नव्हती, त्यामुळे सदर वाळूने भरलेले डंपर तहसील कार्यालयात आणून जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी डंपर मालक मनोज दिलीप लोहार यांना ४ लाख ६२ हजाराची दंडात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.

सात दिवसात रक्कम भरण्याचे नमूद केले आहे. महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी पुन्हा मोहीम हाती घेतल्याने वाळू तस्करांंमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशासनाने यात सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com