नंदुरबारात एकाच दिवशी दोघा करोनाबाधीतांचा मृत्यू
नंदुरबार

नंदुरबारात एकाच दिवशी दोघा करोनाबाधीतांचा मृत्यू

रुग्णांची संख्या ६०० पार

Ramsing Pardeshi

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

नंदुरबार शहरात आज करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोना बळींची संख्या आता ३३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाचे ४५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकुण कोरोनाबाधीतांची संख्या ६०५ झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात करोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज एकाच दिवशी दोघा करोनाबाधीतांचा मृत्यू झाला. नंदुरबार शहरातील कुंभारगल्ली येथील एका ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने दि. २८ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. तसेच नंदुरबारातील स्वराज्यनगरातील ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल दि. २६ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतू आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबळींची संख्या आता ३३ झाली आहे.

दरम्यान, आज जिल्हयात ४५ नवे करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार येथील ४०, तळोदा येथील ३, नवापूर व शहादा येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे एकुण कोरोनाबाधीतांची संख्या आता ६०५ झाली आहे. यापैकी ३८२ रुग्ण करोनामुक्त झाले असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७१ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com