तळोदा येथील अनाथालयातील दोन बालकांचे अपहरण

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

तळोदा (Taloda) येथील अनाथालयातील दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत (Taloda Police Thane) तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील अनाथालयात असलेल्या १४ व १५ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांना दि. १८ सप्टेंबरच्या ११.३० ते १९ सप्टेंबरच्या पहाटे ५.३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले.

याबाबत शिंगावे ता.शिरपूर (Shirpur) येथील बालगृहाचे अधीक्षक संदीप भामरे (ह.मु.खान्देशी गल्ली, तळोदा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा करीत आहेत.

Related Stories

No stories found.