नंदुरबार | प्रतिनिधी - nandurbar

आयफोन स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून शहरातील तीघा युवकांची २ लाख ४४ हजाराची ऑनलाईन फसणूक केल्याप्रकरणी एकाविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील बोहरीगल्ली येथे राहणारे अली अजगर हकीउमद्दीन यांना इस्टांग्रामवर ऍपलचा आयफॉन स्वस्तात देण्याचे जाहिरात देवून आमिष दाखवून पैसे टाकण्यास सांगितले.

अली हकीउमद्दीन यांचा मुलगा व त्यांचे दोन मित्र यांनाही आयफोन स्वस्तात देतो असे आमिष दाखवून गुगलपेवर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. दि.२२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान अलीहकीमुउद्दीन यांनी वेळोवेळी बँक खात्यात २ लाख ४४ हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.

त्यानंतर मोबाईल देण्यास टाळाटाळ केली. रक्कम परत मागितली असता परत देण्यास नकार देवून फसवणूक केल्याप्रकरणी अली हकीमुउद्दीन यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कुसई नरसिंघवाला, बुरानोद्दीन नरसिंघवाला, तस्लीम नरसिंघवाला तिन्ही रा. जमजम कॉम्प्लेक्स उज्जैन (मध्यप्रदेश), कुतूबुद्दीन चंदाभाईवाला रा.शिवाजीगंज (उज्जैन,म.प्र.) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि आर.व्ही.कळमळकर करीत आहेत.