दोन लाखाची गांजाची झाडे जप्त; एकास अटक

 दोन लाखाची गांजाची झाडे जप्त; एकास अटक

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील लालपूर (Lalpur) येथे पोलीसांनी(Police) शेतात छापा (raided) टाकून 2 लाख 26 हजार 816 रूपये किंमतीची 28 किलो 325 ग्रॅम वजनाची गांजाची (marijuana)झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील लालपुर गावाच्या शिवारात सत्तर पाया वसावे रा.कोराई (ता.अक्ककुवा) याने आपल्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक गांजाचे झाडांची मका, तूर व आंबाडी यामध्ये लागवड केली होती.

याबाबत पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता, तेथे 2 लाख 68 हजार 816 रूपये किंमतीचे 144 गांजा सदृश्य झाडे आढळून आली. 28 किलो 325 ग्रॅम एवढे गांजाचे वजन आहे.

याप्रकरणी पोलीसांनी सत्तर पाया वसावे उर्फ सत्तर महाराज याला अटक केली असून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि आर.एन.शिंगटे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com