चार लाखाच्या चोरी प्रकरणी दोन आरोपी जेरबंद

चार लाखाच्या चोरी प्रकरणी  दोन आरोपी जेरबंद

नंदुरबार Nandurbar। वार्ताहर

खेतिया येथे झालेल्या 4 लाखाच्या (Rs 4 lakh) चोरी प्रकरणी (theft case) मुद्देमाला सह 2 आरोपींना (Two accused) जेरबंद (arrested) करण्यात खेतिया पोलीसांचे (Police) यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दशरथ कुंभार यांनी त्यांचे जुने घर बायगोर येथील दिलीप गिरधारी पटेल यांना नऊ लाखात विकले होते. दिलीप पटेल यांनी आधी पाच लाख रुपये दिले होते.उर्वरित रक्कम दि. 31 ऑगस्ट 2021 रोजी खेतिया येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधून दिलीप पटेल यांनी 4 लाख रुपये काढून दशरथ कुंभार यांना दिले.

त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोटारसायकलीच्या डिक्कीमध्ये ठेवले अज्ञाताने मोटारसायकलीच्या डिक्कीतून रोकड लंपास केले. दशरथ कुंभार यांनी खेतिया पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संतोष सावळे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्यात आले.

यावेळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक व्यक्ती घटनास्थळी मोटरसायकलच्या डिकीतून पैसे काढत असताना निदर्शनास आले व अशोक रोड येथून चार चाकी वाहनात बसून तेथून पसार झाला. सदर वाहन हे पानसेमल कडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले त्यात सदर वाहनाचा नंबर ही होता लागलीच पोलिसांनी धामनोद, इंदौर- देवास बायपास आणि छपरी टोल येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये संशयास्पद वाहन जातांना दिसून आले त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू होता सदर वाहनाचे एमपी ट्रान्सपोर्ट वरील वाहन मालक आणि वाहन हे तपासले असता सदर वाहन हे राहुल शिवप्रसद सिसोदिया रा.केयरअप वैभव राठोर नवल मोहल्ला गंज असे दिसले.

त्यानंतर पोलिसांकडून वाहन व चोरट्यांची शोध मोहीम हीच सुरू होती दरम्यान तपास करीत असता ग्राम कडिया पोलीस स्टेशन बौडा जिल्हा राजगड येथे पोलीस पोहचले. कडिया येथेही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत असे सांगण्यात आले त्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम ही सुरू होती दरम्यान पोलिसांची टीम दि.9 सप्टेंबर रोजी ए. बी.रोड गुजरी येथे पोहचली.

तपास करीत असतांना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, सदर वाहन (एमपी 37, सी.5915 ) ही मानपुर येथील पटेल हॉटेल येथे उभी आहे.त्यात दोन इसम बसले आहेत अशी गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घेराबंदी करून सदर व्यक्तींना ताब्यात घेतले यावेळी त्यांची विचारपूस केली.

दिवान सिंह मंगल सिसोदीया व सचिन भगवान सिसोदिया रा.कडिया सासी जिल्हा राजगड यांना अटक करून पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी खेतिया येथे चोरी केल्याचा गुन्हा कबुल केला व पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून त्यांच्याकडील एकूण 3 लाख 70 हजार रुपये रोख तथा सदर घटनेत वापर केलेल्या वाहन जप्त केल.

त्यानंतर दोन्ही आरोपींना जेरबंद केले खेतिया आणि जप्त केलेल्या रोकड व वाहन यास सुरक्षित ठेवण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक बडवानी, सहाय्यक पोलीस अधीक्षक बडवानी, एसडीओपी राजपुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सदर टीम मध्ये खेतिया पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष सावळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कैलाशसिंह चौहान, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजेंद्रसिंह ठाकूर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल पाठक, पोलिस कर्मचारी आबिद शेख, रेवाराम अछाले, जावेद मकरानी, गजराज, हेमंत कुशवाह, हेमंत मंडलोई, राजेश किराडे, शिवराज मंडलोई यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com