शहादा येथे रोहित्राला आग

शहादा येथे रोहित्राला आग

शहादा - Shahada - ता.प्र :

शहरातील जनता चौकालागत असलेल्या राज्य महावितरण विज कंपनीच्या रोहित्रातून बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक धूर निघू लागला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अभियंता सुजित पाटील यांनी तातडीने पोहोचून परिसरातील विद्युत प्रवाह खंडित करून रोहित्रास लागलेली आग विझविण्यासाठी पालिकेच्या अग्निशामक बंबाच्या सहकार्य करून आग आटोक्यात आणली. यादरम्यान परिसरातील वसाहतीच्या विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला होता.

राज्य महावितरण वीज कंपनीच्या कार्यालयाकडून जुना प्रकाशा रोड सरदार वल्लभभाई पटेल मार्ग जनता चौक - वन विभागाच्या कार्यालयालगत वीज मंडळाकडून रोहित्र बसविण्यात आले आहे.

इक्बाल चौक सरदार वल्लभभाई पटेल मार्ग जनता चौक पालिकेसमोर असलेले कै काशिनाथभाई पाटील मार्केट या परिसराला या रोहित्रावरून विद्युत पुरवठा केला जात होता. गेल्या तीन-चार वर्षांपासून शहादा शहर व ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून 24 तास विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून हवेतील तापमानातील बदल झाल्यामुळे वातावरण गरम होऊ लागलेले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावर उन्हाचे चटके लागू लागले आहेत. भर दुपारी रस्ता शुकशुकाट होऊ लागलेला आहे.

घरी बसल्या टीव्हीवरील विविध कार्यक्रम, फ्रीज, कूलर,, एसी यामुळे वीज मागणी वाढत चाललेली आहे. सरदार वल्लभभाई पाटील मार्गावरील वन विभागाच्या कार्यालय महावितरण वीज कंपनीचे रोहित्र लावण्यात आले आहे.

काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक या रोहित्राने पेट घेण्यास सुरुवात केली. खादी भंडार फ्रिज कूलर दुरुस्ती खरेदी विक्रीची दुकाने समोरच असल्याने घटना दिसताच संबंधित व्यक्तीने शहादा सहाय्यक अभियंता सुजित पाटील यांना भ्रमणध्वनी करून घटनेची माहिती दिली.

अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून प्रथम या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला. नगरपालिका अग्निशामक बंबला पाचारण करत रोहित्रााला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न केले.

सहाय्यक अभियंता श्री.पाटील यांच्या तत्परतेमुळे होणारी मोठी दुर्घटना टळली. सायंकाळी रोहित्राला लागलेल्या आगीमुळे बर्‍याच वेळ या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.

ऊन्हाचे तापमान वाढत आहे, रोहित्राखाली ऑईल पडले असल्याने आग लागली असावी. मात्र त्यात दुरूस्ती करून रोहित्रावरून विज पुरवठा सुरळीत झाला आहे, असे सहाय्यक अभियंता सुजित पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com