पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला तोरणमाळच्या विकासाचा आढावा

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला तोरणमाळच्या विकासाचा आढावा

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी -

राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Tourism Minister Aditya Thackeray यांनी आज महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ Toranmal ता.धडगावच्या विकासासंदर्भात आढावा reviewed the development घेतला.

ना.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात तोरणमाळच्या विकासासंदर्भात बैठक संपन्न झाली. बैठकीस नंदुरबार व धुळे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात, पर्यटन संचालक श्री.सावळकर, उपजिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य गणेश पराडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बबनराव थोरात यांनी तोरणमाळ विकास आराखडा सादर करून तोरणमाळ विकासासंदर्भात चर्चा केली. तोरणमाळचा विकास झाल्यास दरवर्षी लाखोच्या संख्येने तोरणमाळ या अध्यात्मिक व प्रेक्षणीय स्थळाला भेट देणार्‍या भाविक व निसर्गप्रेमींना नक्कीच भुरळ घालेल.

तोरणमाळ व आजुबाजुच्या परिसरात वृक्षलागवड झाल्यास पर्यटन विकासासोबतच पर्यावरणाचाही समतोल राखण्यात यश येईल असे मत गणेश पराडके यांनी मांडले. व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारा नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, डॉ विक्रांत मोरे, तसेच वनाधिकारी देखील उपस्थित होते.

तोरणमाळच्या विकासाला लवकरात लवकर गती देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी ना.ठाकरे यांनी दिले. याप्रसंगी धडगांव तालुकाप्रमुख महेशकुमार पाडवी, युवासेनेचे जिल्हा चिटणीस योगेश पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com