नंदुरबार : रुग्णांचे त्रिशतक

नवीन 28 रुग्णांची दिवसभरात भर, 11 कोरोनामुक्त

नंदुरबार : रुग्णांचे त्रिशतक

नंदुरबार - Nandurbar :

नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे नवे 28 रुग्ण आढळून आल्याने जिल्हयातील कोरोना रुग्णांची त्रिशतक पूर्ण केले आहे. यात नंदुरबारातील दहा, शहाद्यातील आठ तर तळोद्यातील दोन रुगणांचा समावेश आहे. दरम्यान, आज 11 रुग्ण तर आतापर्यंत 182 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 99 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज सलग तिसर्‍या दिवशी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 15 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात कोरोनाच्या रुग्णांनी आज त्रिशतक पूर्ण केले आहे. आज जिल्हयात 20 नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्हयातील एकुण रुग्णांची संख्या 304 झाली आहे. यापैकी 182 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 99 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल दि. 14 रोजी जिल्हयात आलेल्या आठ कोरोनाबाधीत व्यक्तींपैकी नंदुरबारातील तुलसीविहार येथील 75 वर्षीय रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे आज जिल्हयात सलग तिसर्‍या दिवशी रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या 15 झाली आहे

दरम्यान, आज दुपारी प्राप्त झालेल्या 18 अहवालांपैकी 4 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले होते. यात शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील 20 वर्षीय पुरुष, म्हसावद रोड शहादा येथील 23 वर्षीय तरुणी, वृंदावनगर शहादा येथील 27 वर्षीय तरुणी, पुसनद ता.शहादा येथील 8 वर्षीय बालिकेचा समावेश होता.

त्यानंतर सायंकाळी 6 वाजता 16 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. यात नंदुरबार येथील कोकणी हिल येथील 49 वर्षीय महिला, श्रॉफ हायस्कुल येथील 33 वर्षीय महिला, रायसिंगपूरा येथील 40 वर्षीय महिला, पायलनगर नंदुरबार येथील 62 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, मोठा माळीवाडा नंदुरबार येथील 39 वर्षीय पुरुष, पाटीलवाडी नंदुरबार येथील 43 वर्षीय पुरुष, सुमननगर तळोदा येथील 37 वर्षीय पुरुष, माळीवाडा तळोदा येथील 21 वर्षीय पुरुष, सोनवद ता.शहदा येथील 25 वर्षीय पुरुष, गिरीविहार नंदुरबार येथील 78 वर्षीय दोन पुरुष, गरीब नवाज कॉलनी शहादा येथील 76 वर्षीय पुरुष, सरस्वतीनगर नंदुरबार येथील 60 वर्षीय पुरुष, गांधीनगर शहादा येथील 53 वर्षीय पुरुष, तर मंदाण ता.शहादा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, आज 11 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात तोरखेडा ता.शहादा येथील 5, जिजाऊनगर शहादा येथील 2, जिल्हा शासकीय रुग्णलयातील एक, जनता पार्क नवापूर येथील एक, तसेच नंदुरबार शहरातील घोडापिर मोहल्ला व खंडेलवालनगरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com