पेट्रोलपंपातून सव्वा तीन लाखाचे डिझेल लंपास

लांबोळा येथील घटना,अज्ञाताविरूध्द गुन्हा
पेट्रोलपंपातून सव्वा तीन लाखाचे डिझेल लंपास

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

शहादा तालुक्यातील लांबोळा येथील पेट्रोलपंपातुन साडेतिन हजार लिटर डिझेल लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील डांबरखेडा येथे राहणार्‍या प्रितेश विजय पाटील यांच्या मालकीचा हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा कृष्णास्तुती या नावाने लांबोळा येथे पेट्रोल पंपाचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी अर्धवट जमिनोदस्त असलेल्या डिझेलच्या टाकीचे लोखंडी कॅप अज्ञात चोरटयांनी उघडून त्यात प्लास्टिकची नळी टाकून ती नळी झाडाच्या अडोश्याला घेवून जावून त्याला हातपंप जोडत ३ लाख २२ हजार ८० रूपये किंमतीचे ३ हजार ६६० लिटर डिझेल लंपास केले. याप्रकरणी प्रितीश पाटील यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ पाडवी करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com