सारंगखेडा,ता.शहादा - Shahada - वार्ताहर :

करोनामुळे व्यवसाय ठप्प झाला असून सोन्याचे दर भरमसाठ वाढलेले असल्याने लहान गावात सोने खरेदीसाठी ग्राहक नाहीत.

त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या येथील सोन्या चांदीचे व्यावसायिकाकडे चोरट्यांनी सलग दुसर्यांदा डल्ला मारला.

आज दिवसाढवळ्या बाजारभावाप्रमाणे सुमारे अडीच लाख रुपयांचे सोने चोरटयांनी चोरून नेले. दुकानात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला पाचशे रुपयांची नोट देत दिशाभूल करत सुमारे साडे चार तोळे सोने लांबविण्यात आले. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. याबाबत सारंगखेडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .

याबाबत अधिक म ाहिती अशी की, गावातील सेंट्रल बॅकेजवळ असलेल्या नरेंद्र सोनार यांच्या श्रीकृष्ण ज्वेलर्स या दुकानात आज दुपारी दोनच्या सुमारास डोक्यावर टोपी, टोपीवर चष्मा, तोंडाला रुमाल लावलेल्या एका तरूणाने प्रवेश करीत मला सोने खरेदी करायचे असल्याचे सांगत काऊंन्टरजवळ आला. श्री. सोनार यांच्या वडिलांनी सोन्याचे दागिने दाखविले. अज्ञात चोरट्याने पाचशे रुपयांच्या काही नोटा हातात दाखविल्या. काऊंटरवरून हात घालून सोन्याची वस्तू घेत पाचशे नोट देत त्याने पळ काढला.

श्रीकृष्ण ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची ही दुसरी घटना आहे. सदर दुकान तीन वर्षापूर्वी गावातील होळी चौकात असतांना दिवसा अशाचप्रकारे पाचशे रुपये अंगावर फेकून सोन्याची दीड लाखांची वस्तू चोरीस गेली होती. आताही दुकान सेंट्रल बँकेजवळ आली आहे.

श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक नरेंद्र सोनार यांना दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी राम मंदिर कुठे आहे अशी विचारणा केली. त्यांनी त्यांच्या वडिलांना दुकानात बसवित मी येतो दाखवायला, मला घरी जेवायला तिकडेच जायचे आहे असे सांगितले.

मंदिर दाखवून ते घरी जेवायला गेले. अज्ञात चोरट्यांनी परत दुकानाकडे वळत पूर्वनियोजित चोरी केली. याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहेत.