‘टिली-मिली’ कार्यक्रम ठरतोय प्रभावी
नंदुरबार

‘टिली-मिली’ कार्यक्रम ठरतोय प्रभावी

दुर्गम भागातील अडचणी कायम

Rajendra Patil

नंदुरबार । प्रतिनिधी । Nandurbar

करोनाच्याच्या पार्श्वभुमिवर यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षातही शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थी अभ्यासापासुन वंचीत राहु नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता शिक्षण विभागाने दूरचित्रवाणीवर टिलीमिली हा कार्यक्रम सुरू केला त्यामुळे ऑनलाईनच्या अडचणीवर मात करीत हा कार्यक्रम आता प्रभावी ठरला आहे. मात्र दुर्गम भागातील अडचणी मात्र राहणार असून त्यात विजेच्या लोडशेडींगचाही प्रमुख अडथळा आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध उपाययोजना हाती घेवून जिल्हा प्रशासामार्फत अंमबजावणी केली जात आहे. कोरोनाचा हा धोका ओसरेपर्यंत शाळा न भरविण्याची भुमिका सरकारने घेतली. या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून ऑनलाईन पध्दतीने जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळाही अशा पध्दतीने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करू लागल्या आहेत.

सुरूवातीच्या टप्यात 50 टक्केच पालकांकडेच अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल होते. त्यामुळे जवळपास 50 टक्के विद्यार्थ्यांच्या ज्ञानादानाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही उणीव समोर आल्यानंतर तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढे येत वर्गनिहाय समाज माध्यमावर गृप तयार केले. यावर नियमितपणे ऑनलाईन धडे देण्यात येवू लागले. मोबाईल नसलेल्या पालकांच्या पाल्यांची सोय त्यांच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांक्डे केली. त्यामुळे हा प्रश्न काहीअंशी सुटला.

आपल्या पाल्याची होणारी गैरसोय विचारात घेवून काही पालकांनी नवीन मोबाईल खरेदी केले. त्यामुळे आजघडीला मोबाईलधारक पालकांची संख्या वाढली असली तरी ज्ञानदानाची ही प्रक्रिया अनेक तांत्रिक अडचणीच्या पाडयात सुरू होती. दरम्यान मुलांचे शैक्षणिक नुकसान कमी करण्याच्या अनुषंगानेच सरकारच्या शिक्षण विभागाकडूनही नावीन्यपूर्ण उपक्रम होती घेती जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दूरचत्रिवाणीवर टिलीमिली हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र वेळ निश्चित केली आहे.

याबाबत शाळांनीही पालकांना अवगत केले आहे. कोणत्या वेळेत कोणत्या वर्गासाठी कार्यक्रम आहेत. याचे वेळापत्रकही दिले आहे. त्यामुळे शाळांनी सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षकाच्या मदतीला आता दूरचित्रवाणीवरील टिलीमिली हा कार्यक्रम धावून आला आहे. दरम्यान यामागे सरकार आणि शाळांचा हेतु प्रामाणिक असला तरी ग्रामीण भागातील भारनियमन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे ज्ञानदानात अडथळे येत आहेत.

सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत ऑनलाईन शिक्षणाचे धडे शिक्षक देत आहेत. परंतु काही प्रमाणात त्यात तांत्रिक अडचण येत असल्याने दुरदर्शनवर शासनाच्या शिक्षण विभागाकडन टिलीमिली हा शैक्षणिक उपक्रम 20 जुलैपासून सुरू केलेला आहे. जिल्ह्यात एकते आठपर्यंत शिकणारे सुमारे दिड लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत टिलीमिलीचा कार्यक्रम पोहचविण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. सदर उपक्रम राबवल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. ऑनलाईन शिक्षकाच्या मदतीला आता हा शैक्षणिक कार्यरत धावून आला आहे.

- पुष्पेंद्र रघुवंशी, सचिव जिल्हा मुख्याध्यापक संघ, नंदुरबार.

Deshdoot
www.deshdoot.com