विद्यार्थ्यांनी तयार केले ‘कोरो डिस्टनन्स’ यंत्र

कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्याचा दावा
याच विद्यार्थ्यांनी तयार केले डिव्हाईस
याच विद्यार्थ्यांनी तयार केले डिव्हाईस

राजेश माळी

सोमावल, ता. तळोदा Nandurbar

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटाइझर, मास्क, तापमापक यंत्र अश्या साधनांचा आधार घेण्यात येत आहे. याबरोबरच त्यावर...

नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधक सुद्धा अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या रोगाचा प्रसार नियंत्रणात आणण्याच्या  दृष्टीने  तळोदा येथील मनीष महेंद्र शहा यांचे अवलिया सुपुत्र भावीन शाह यांनी आपले तीन मित्र वैष्णवी देशमाने, रुपल अग्रवाल व अनुज मुथा यांच्यासोबत नाशिक येथील पॉलिटेक्निक मध्ये शिक्षण घेत असताना ‘कोरो डिस्टनन्स’ नावाचे डिव्हाईस विकसित केले आहे . हे डिव्हाईस गर्दी असलेल्या स्थळी अत्यंत उपयुक्त कार्य करेल व कोरोनाच्या प्रसारावर  नियंत्रण आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल असे भावीन शहा यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागात डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना ‘कोरो डिस्टनन्स’ या डिव्हाईसचा शोध लावला. या अंतर्गत प्रमुख तीन डिव्हाईस विद्यार्थांनी विकसित केले आहेत. पहिले तापमापक सेन्सिंग डिव्हाईस विकसित केले आहे.

यात डिव्हाईस सेन्सर 5 ते 7 इंच अंतरावर व्यक्तीने आपला तळ हात धरल्यावर काही सेकंदातच म्हणजे दोन ते तीन सेकंदात त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान डीव्हाईसच्या स्क्रीनवर डिस्प्ले होते. जर त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाईट व त्यापेक्षा अधिक आढळून आल्यास डिव्हाईस वरील लाल बल्ब लागून अलार्म वाजतो व सावधानतेचा इशारा डिव्हाईसमार्फत देण्यात येतो.

डिव्हाईसच्या दुसर्‍या प्रकारात सेन्सर सह कॅमेरा लावण्यात आला आहे. त्यामुळे व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाईट व यापेक्षा अधिक आढळून आल्यास धोेकादर्शक लाल लाईट लागून अलार्म सुद्धा वाजतो. त्यासोबतच त्या व्यक्तीची डिव्हाईसमार्फत ओळख शोधण्यात येते व ओळख निश्चित झाल्यावर त्या व्यक्तीची माहिती विशिष्ट कॉम्पुटरला पाठवण्यात येते आणि ही माहितीची काम्प्युटरमध्ये साठवणूक करण्यात येते.

तिसर्‍या डिव्हाईसला त्यांनी सोशल डिस्टन्सींग डीव्हाईस असे नाव ठेवले आहे . या विद्यार्थांनी विकसित केलेले हे डिव्हाईस सोशल डिस्टनसिंग ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे डिव्हाईस व्यक्तींनी ओळखपत्राप्रमाणे आपल्या गळ्यात घालून दैनंदिन कामे करावयाची आहेत.

परंतु ही दैनंदिन कामे करतांना डिव्हाईस ज्या व्यक्तीने गळ्यात घातले आहे. त्या व्यक्तीपासून सहा फुटाच्या कक्षेत अन्य व्यक्ती आल्यास हे डिव्हाईस वरील अलार्म वाजवतो व डिव्हाईचा लाल बल्बही लागतो. अश्याप्रकारे हे डिव्हाईचा सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यासही मदत करते.

सर्व सामान्यांना परवडेल अश्या किमतीत तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव काळातच म्हणजे अत्यंत कमी कालावधीत अश्या प्रकारचे डिव्हाईस विकसित करुन कोरोना रोगापासून डिव्हाईस वापरणार्‍याला व इतरांचा बचाव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे डिव्हाईस बनविण्याचे आव्हान या विद्यार्थ्यांसमोर होते. त्याअनुषंगाने अवघ्या एका महिन्यातच रात्रंदिवस मेहनत करुन डिव्हाईसला मूर्त स्वरूप दिले.

हे विकसित केलेले तीनही डिव्हाईस बनविण्यासाठी केवळ 3 हजार 100 रुपये त्यांना लागलेत. या विद्यार्थ्यांचा या डिव्हाईस मागणीनुसार उत्पादन करण्याचा मानस आहे. या डिव्हाईसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले तर 3100 रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वसामान्यांना हातात पडेल. या डिव्हाईसचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

एक वर्षापुर्वी याच विद्यार्थ्यांकडून सायबर सिक्युरीटी सॉफ्टवेअर विकसीत नाशिक येथील के.के. वाघ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हे विद्यार्थी कॉम्पुटर विषयात डिप्लोमाचे शिक्षण घेत आहेत.एका वर्षापूर्वी या विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर विकसित केले होते. सायबर गुन्हावर आळा घालण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. या संशोधनाची दखल नाशिक येथील पोलीस विभागाच्या सायबर सेलने घेवुन पोलीस विभागाने या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविले होते.

गर्दीच्या ठिकाणी होणार उपयोग : विद्यार्थ्यांनी संशोधित केलेल्या तीनही डिव्हाईसचा अत्यंत प्रभावी उपयोग मोठ मोठ्या ऑफिस, मॉल, शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल यासह गर्दीच्या ठिकाणी अत्यंत माफक किमतीत होवू शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com