चार वेळा भूमिपूजन  होऊनही बोरद ते वेळावद रस्ता मात्र जैसे थे

चार वेळा भूमिपूजन होऊनही बोरद ते वेळावद रस्ता मात्र जैसे थे

डांबरीकरण करण्याची नागरीकांची मागणी

बोरद Board ता. तळोदा । वार्ताहर

तळोदा Taloda तालुक्यातील बोरद ते वेळावद या 4 किमी रस्त्याचे 25 वर्षात चार वेळा भूमिपूजन Bhumipujan होऊन ही रस्ता जैसे थे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे People's Representatives याकडे दुर्लक्ष असून आ. राजेश पाडवी यांनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता मंजूर करून रस्त्याचे डांबरीकरण Asphalting of the road करण्यात यावे अशी मागणी तुळाजा, वेळावद, करडे वाडी पुनर्वसन ई. गावातील नागरिकांनी केली आहे.

25 वर्षात बोरद ते वेळावद या 4 किमी रस्त्याचे चार वेळा भूमिपूजन झाले,मात्र रस्त्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हा रस्ता मंजुरच झालेला नाही फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे,असे सिद्ध होत आहे, असे दबक्या आवाजात बोलले जात आहे. नुकताच न्युबन ते बोरद, छोटा धनपुर बोरद व लाखापुर ते बोरद या रस्त्यानं मंजुरी मिळून त्याचे कामही झाले.

वेळावद ते बोरद हा रस्ता अत्यंत जिकरीचा आहे. कारण रस्त्याअभावी तळोदा ते तुळाजा बससेवा दहा वर्षापासून बंद झालेली आहे. ती दोन वर्षापूर्वी कलमाडी मार्गे सुरू झालेली होती मात्र कोरोना काळात बससेवा बंद करण्यात आली. आता शाळा सुरू झाल्याने तुळाजा, वेळावद, वाडी पुनर्वसन यांना बोरत येथे शाळेत येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तसेच शेतकर्‍यांना आपल्या शेतात जाण्यासाठी कसरत करीत जावे लागते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती या रस्त्याची झाली आहे.

आ. राजेश पाडवी यांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा या परिसरातील जनतेने व्यक्त केली आहे. तसेच बोरद गटातील जि. प सदस्य, प. स. सदस्य यांनी या रस्त्याची मागणी आ. राजेश पाडवी यांच्याकडे लावून धरावी म्हणजेच रस्त्याच्या कामाला गती मिळेल अशी परिसरातील शेतकरी व नागरिकांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com