जिल्हयात रुग्णसंख्या पाचशे पार
नंदुरबार

जिल्हयात रुग्णसंख्या पाचशे पार

तिघांचा मृत्यू , कोरोनाबळींची संख्या 28

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज 23 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून दोघा महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकुण कोरोनाबळींची संख्या 28 झाली आहे. मयतांमध्ये नंदुरबारच्या 16, शहाद्याच्या 10, नवापूरच्या दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या पाचशेवर पोहचली आहे.

नंदुरबार जिल्हयात आज 23 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. यात नंदुरबारातील 17 तर शहाद्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये नंदुरबारातील हरिभाऊ नगरातील 17 व 40 वर्षीय महिला, खोंडामाळी येथील 34 वर्षीय पुरुष, भाग्योदय नगरातील 61 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनीतील 80 वर्षीय महिला, गणेशनगरातील 34 वर्षीय पुरुष, 29, 10 व 53 वर्षीय महिला, धर्मराज नगरातील 64 वर्षीय महिला, 44 व 15 वर्षीय पुरुष्ज्ञ,

शिवाजी रोड कासार गल्लीतील 70 वर्षीय महिला, देसाईपूरा येथील 23 च 24 वर्षीय तरुणी, गुरुकुलनगरातील 55 वर्षीय पुरुष, जुनी भोई गल्लीतील 45 वर्षीय महिला, वैजाली ता.शहादा येथील 34 वर्षीय पुरुष, मच्छी बाजार शहादा येथील 38 वर्षीय पुरुष, 16 व 14 वर्षीय तरुणी, गरीब नवाज कॉलनी शहादा येथील 31 वर्षीय महिला, नागेशनगर शहादा येथील 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हयात कोरोना रुग्णांचे पाचवे शतक पूर्ण झाले आहे. आज आढळलेल्या 23 रुग्णांमुळे जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या 513 वर पोहचली आहे. यापैकी 330 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 166 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तिघांचा मृत्यू

दरम्यान, दोघा महिलांसह तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कुकडेल शहादा येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि.25 जुलै रोजी मृत्यू झाला होता. काल रात्री उशीरा त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रामकृष्णनगर तळोदा येथील 70 वर्षीय बाधित महिलेचा काल मृत्यू झाला. रात्री तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहादा नगरपालिकेजवळ राहणार्‍या 62 वर्षीय बाधित महिलेचा आज पहाटे 1 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. काल सायंकाळी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.यामुळे जिल्हयातील कोरोना बळींची संख्या 28 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com