नंदुरबार : जिल्हयात  रुग्णसंख्या चारशे पार
नंदुरबार

नंदुरबार : जिल्हयात रुग्णसंख्या चारशे पार

एकाच दिवशी आढळले 35 रुग्ण ; 20 रुग्ण करोनामुक्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज एकाच दिवशी 35 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकुण रुग्णांची संख्या 400 झाली आहे. तर 20 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 248 रुग्णांनी कोरानावर मात केली आहे. सध्या 137 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज जिल्हयात एकाच दिवशी 35 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार येथील 21, शहादा येथील 10, नवापूर येथील दोन तर तळोदा व दोंडाईचा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नंदुरबारातील गणेशनगरातील 60 वर्षीय पुरुष, रायसिंगपुरा येथील 65 वर्षीय पुरुष, जुनी सिंधी कॉलनीतील 70 वर्षीय पुरुष, देसाईपुर्‍यातील 43 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवती, 15 वर्षीय युवती, 69 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, जुनी भोई गल्लीतील 33 वर्षीय पुरुष, सरस्वतीनगरातील 20 वर्षीय युवक, 22 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, धर्मराजनगरातील 39 वर्षीय पुरुष, पायलनगरातील 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालक, जुनी सिंधी कॉलनीतील 35 वर्षीय पुरुष, वृंदावन सोसायटीतील 45 वर्षीय पुरुष, कलमनगर वाघोदा शिवारातील 59 वर्षीय पुरुष, कोठडा ता.नंदुरबार येथील 65 वर्षीय महिला, सरदार चौक नवापूर येथील 48 वर्षीय पुरुष, इंदिरानगर नवापूर येथील 70 वर्षीय पुरुष, गरीब नवाज कॉलनी शहादा येथील 40 वर्षीय पुरुष, तकिया बाजार शहादा येथील 50 वर्षीय पुरुष, गांधीनगरातील 5 वर्षीय बालक, दीड वर्षीय बालिका, 22 वर्षीय युवती, 28 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, कुंभारगल्लीतील 18 वर्षीय युवक, 43 वर्षीय पुरुष, सरदार पटेल चौक कुकडेल येथील 20 वर्षीय युवक, तळोदा येथील कुरेशी गल्लीतील 40 वर्षीय पुरुष, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील मंजीपुरा भागातील 25 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्हयात आज एकाच दिवशी 20 रुग्णांनी कोरानावर मात केली. यात नंदुरबार शहरातील 13, शहादा तालुक्यातील 6 व नवापूर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये नंदुरबारातील देसाईपुरा, सिद्धीविनायक चौक, कोकणी हिल, कल्याणी पार्क, वाघेश्वरी नगर, नागाईनगर, सहारा टाऊन, रायसिंगपूरा, हुडको कॉलनी, परदेशीपुर्‍यातील प्रत्येकी एक, चौधरी गल्लीतील दोन, शहादा येथील मुलब्रिजनगर, सदाशिवनगर, विजयनगर, तोरखेडा येथील प्रत्येकी एक रुग्ण, डोंगरगाव येथील दोन रुग्ण, तसेच खांडबारा ता.नवापूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

यासोबतच एकुण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 248 झाली आहे. सध्या 135 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 2 हजार 832 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 हजार 378 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. 400 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यापैकी 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 70 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com