किरकोळ कारणावरून जमावाची दोघांना मारहाण

7 जणांविरूध्द गुन्हा
किरकोळ कारणावरून जमावाची दोघांना मारहाण

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील करजकुपा Karjakupa येथे शिवीगाळ करू नको, अशी विचारणा केल्याच्या रागातून सात जणांनी दोघांना मारहाण Beating केल्याची घटना घडली. याप्रकरणी 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल Filed a crime करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबालाल मुरार पाटील यांनी बँकेतून कर्ज घेतले होते. त्यासाठी जामीनदार असलेल्या नरेंद्र राजाराम पाटील यांना बँकेने नोटीस दिली. त्याचा राग येवून नरेंद्र पाटील यांनी अंबालाल पाटील यांना शिवीगाळ केली. याबाबत शिवीगाळ करू नको, असे सांगण्याचा राग येवून आता तुम्हाला गावात राहू देणार नाही. तुम्हाला मारून टाकू अशी दमदाटी करून नरेंद्र पाटील यांनी हातातील काठीने पोपट पुंजू पाटील यांना मारहाण केली. तसेच अंबालाल पाटील यांना मारहाण केली म्हणून पोपट पुंजू पाटील रा.करजकुपा (ता.नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात नरेंद्र राजाराम पाटील, कुणाल नरेंद्र पाटील, बुधा गोपाल पाटील, राजाराम गोविंद पाटील, विनोद धिरजी पाटील, शुभम दिलीप पाटील, दिलीप धिरजी पाटील सर्व रा.करजकुपा (ता.नंदुरबार) यांच्या विरूध्द भादंवि कलम 143, 147, 149, 324, 148, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधा पाटील व राजाराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई देविदास सोनवणे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com