Photo : जीप दरित कोसळली ; सहा मजूर ठार

तोरणमाल ते खड़की रोडवरील घटना, 20 प्रवाशी होते जीपमध्ये, गंभीर जखमी नंदुरबार रूग्णालयात
Photo : जीप दरित कोसळली ; सहा मजूर ठार

नंदुरबार - Nandurbar

तोरणमाळहून १५ कि.मी. अंतरावर तोरणमाळ ते खडकी दरम्यान जीपचा अपघात झाला आहे. या अपघातात सहा मजूर ठार झाल्याची घटना आज घडली आहे.

यात बसलेले इतर 10 प्रवासीही जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.आहे.

ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या अपघातात मयत झालेले सहा जण हे खड़की या गांवचे आहेत. अपघातात जीपचे तुकडे तुकडे झाले आहेत.

राज्यातील क्रमांक दोन चे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकी येथे मजुरांना घेवून जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ६ मजूर ठार झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

तोरणमाळ खडकी रस्त्यावर ही घटना घडली आहे. गावातील काही मजुरांना नियमितपणे ही जीप ये जा करत होती. आज सकाळी तोरणमाळ खडकी रस्त्यावर अचानक या जीपला अपघात झाला. अपघातानंतर जीप खोल दरी कोसळली. या भीषण अपघातात जीपचा फक्त सांगडाच उरला आहे.

दरीत ठिकठिकाणी मजुरांचे मृतदेह पडून आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com