नंदुरबार| प्रतिनिधी - Nandurbar

शहादा- शिरपूर रस्त्यावरील कहाटुळ फाटयाजवळ मजूरीच्या कामासाठी जाणार्या जीपचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहेे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील लिबर्डी येथे राहणार्या मजूर टरबुज तोडणीसाठी शिरपूर येथे महिंद्रा मॅक्स (क्र.एम.एच.०४- सी.टी.१२८२) व जात असतांना

यावरील चालक तुकाराम वळवी याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात वाहन चालविले. दरम्यान रस्त्यात गाय आल्याने तिला वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला असता मागचा टायर फुटून जीप उलटली.

या अपघातात किसरन दित्या पाडवी, योगेश राम पाडवी, काला सायसिंग वळवी, सेबीबाई ईश्वर पटले, सरलाबाई दाज्या पाडवी सर्व रा. लिबर्डी यांना दुखापत झाली.

याप्रकरणी किसरन दित्या पाडवी यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात चालक तुकाराम सिताराम पाडवी रा. नवागांव (ता.शहादा) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ देविदास नाईक करत आहेत.