विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम – जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांचा गौरव
नंदुरबार

विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम – जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांचा गौरव

Balvant Gaikwad

विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना नाशिक विभागातून गौरविण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2019 ची निवडणुक निर्भय, मुक्त व पारदर्शी वातावरणात पार पडली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील निवडणुकीचे काम केलेले सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या कामकाजाप्रती दिलेले योगदान विचारात घेऊन या निवडणुकीसाठी प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणुक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

यासंदर्भात मुख्य निवडणुक अधिकारी स्तरावर सर्व जिल्हयांचे गुणांकन करण्यात आले आहे. यामधून पुणे विभाग सर्वोत्कृष्ट ठरला असून संबंधित गुणांकनातून सर्व जिल्हयातून सर्वाधिक गुण मिळालेले तीन जिल्हे व प्रत्येक विभागातून 1 जिल्हयाची निवड करण्यात आलेली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com