करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक
नंदुरबार

करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक

दोन दिवसांत 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू,18 व्यक्ती झाले संसर्गमुक्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत आहे.दोन दिवसात 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. तसेच काल तळोदा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 771 झाली आहे. दरम्यान आज 18 जण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यात दिवसेंदिवस येणार्‍या अहवालातून कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांचा मृत्यू अन् सर्वाधिक पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याची धक्कादायक वार्ता येत आहे. काल दि.5 रोजी रात्री 9.30 वाजेदरम्यान आलेल्या अहवालात एकाच वेळी 49 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यात 2 ते 12 वर्षीय वयोगटातील 9 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. नंदुरबार शहरातील जयहिंद कॉलनी 32 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय पुरूष, सिध्दीविनायक चौकात 22 वर्षीय महिला, कंजरवाडयात 47 वषी्रय पुरूष, मंगलमुर्ती नगरात दोन वर्षीय बालक, 14 वर्षीय युवक, संजय नगरात 58 वर्षीय पुरूष, अहिल्याबाई विहिर परिसरात 26 वर्षीय पुरूष, 16 वर्षीय युवक, 80 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, तुप बाजार परिसरात 32 वर्षीय पुरूष, सिंधी कॉलनीत 60 वर्षीय महिला, विद्यानगर धुळे चौफुली परिसरात 28 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला 5 वर्षीय बालक, स्वामी समर्थ नगरात 65 वषी्रय महिला, नंदुरबार तालुक्यातील दुधाळे शिवारातील शंकर नगरात 51 वर्षीय पुरूष, दहिंदुले येथे 60 वर्षीय पुरूष , 20 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरूष, शनिमांडळ येथे 40 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, भोणे येथे 32 वर्षीय पुरूष, विखरण येथे 40 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, 12 वषी्रय बालिका, 8 वर्षीय बालिका, 7 वर्षीय बालक, 44 वर्षीय पुरूष, शहादा शहरातील शिवाजी नगरात 57 वर्षीय पुरूष, नागसेन नगरात 50 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 40 वर्षीय महिला, तळोदा शहरात भोई गल्लीत 30 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक, 9 वर्षीय बालक, 6 वर्षीय बालक, 27 वर्षीय महिला, प्रतापनगरात 51 वर्षीय पुरूष भोईवाडयात 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, 52 वर्षीय महिला, नवापूर शहरातील शेवळी पार्कमध्ये 47 वर्षीय महिला, जनतापार्क 52 वर्षीय पुरूष, नवापूर तालुक्यातील देवळफळी ययेथे 12 वर्षीय बालिका असे एकूण 49 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.तर दि.6 रोजी 4 कोरोना रूग्ण आढळले.यात शहादा तालुक्यातील कलसाडी येथील 23 वर्षीय युवक,साक्री तालुक्यातील निजामपुर येथील 23 वर्षीय पुरूष,नंदुरबार शहरातील 47 वर्षीय पुरूष,गवळीवाडा येथील40 वर्षीय महिलेचा यांचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 771 झाली आहे. दरम्यान दि.5 राजी नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील एका 75 वर्षीय बाधित वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाधित वृध्दाला मंगळवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.तर दि.6 ऑगस्ट रोजीे तळोदा येथील दोघांचा मृत्यू झाला यातील एकाचा नाशिक येथे मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com