दोन वेळा कारवाई करुनही सुरु असलेला जुगार अड्डा अखेर बंद

देशदूत वृत्ताची दखल : सारंगखेडा येथील जुगार अड्डयावर कारवाई
दोन वेळा कारवाई करुनही सुरु असलेला जुगार अड्डा अखेर बंद
Crime news

शहादा | ता.प्र. - Sahada

तालुक्यातील सारंगखेडा Sarangkheda येथे पोलिसांनी दोन वेळा कारवाई करूनही सुरू असलेला जुगार अड्डा अखेर बंद झाला आहे. ‘सारंगखेडा येथील जुगार अड्डा Gambling den पोलिसांना देतोय आव्हान’ या मथळ्याखाली ‘देशदूत’ने या जुगार अड्ड्याबाबत सविस्तर वृत्तांत प्रसिध्द करून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे हा जुगार अड्डा बंद करण्यात आला आहे.

घोडेबाजारासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथे वीजवितरण कंपनीच्या सबस्टेशनजवळ शेल्टी रस्त्यावर एका शेतात घरवजा पत्र्याच्या शेडमध्ये जुगाराचा मोठा अड्डा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. या जुगार अड्ड्यावर मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील तसेच शहादा, शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा येथील जुगारी जुगार खेळण्यासाठी येत होते. सोबत दिमतीला व्हीआयपी गाड्यांचा ताफा असल्यामुळे जुगारींची रेलचेल वाढली होती. त्यामुळे जुगारींचा राबता पाहता रात्रीच्या अंधारात लाखोंची उलाढाल केली जात होती.

या जुगार अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेळा ‘रेड’ केली होती. दुसरी रेड गत मंगळवारी रात्री करण्यात आली. त्यावेळी दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यात चार जुगारींवर गुन्हा दाखल झाला. मात्र, जुगार चालक व जागा मालकाला कारवाईतून वगळण्यात आले होते.

त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने कारवाईबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. असे असताना दोन वेळा रेड होऊनही हा जुगार अड्डा सुरूच ठेवून एकप्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले गेले. त्यामुळे ‘देशदूत’मधून या जुगार अड्डयाबाबत सविस्तर भांडाफोड करून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळेच पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई होण्याअगोदरच हा जुगार अड्डा बंद करण्यात आला आहे.

जुगार अड्डयाचे दोंडाईचात स्थलांतर अन कारवाई

सारंगखेडा येथील हा जुगार अड्डा बंद झाल्यामुळे दि.३० जुलै रोजी दोंडाईचा येथे शहादा रोडवर द्वारका ढाब्याच्या मागे स्थलांतर करून सुरू करण्यात आला. या जुगार अड्डयाची माहिती धुळे पोलिसांच्या स्थानिंक गुन्हाशाखेला मिळाली आणि रात्रीच्या अंधारात जुगारींची मैफिल बहारात आली असतानाच रेड पडली.

त्यात जागा मालकासह ११ जुगारींवर गुन्हा दाखल होऊन सुमारे रोख रकमेसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुुळे पोलिसांनी जागा मालकावरही गुन्हा दाखल केला. मात्र, सारंगखेडा येथील कारवाईत नंदुरबारच्या एलसीबीने जागा मालकाला अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com