ट्रक अडवून चालक-मालकाला मारहाण, लाखो रुपयांचे कपडे लंपास

नंदुरबार-निझर रस्त्यावरील घटना
ट्रक अडवून चालक-मालकाला मारहाण, लाखो रुपयांचे कपडे लंपास

नंदुरबार Nadurbar। प्रतिनिधी -

रस्त्यावर ट्रक अडवून Blocking the truck चालक व मालकाचे हाथ पाय बांधून मारहाण Beating करण्यात आल्याची घटना काल मध्यरात्री घडली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून ट्रकमधील लाखो रुपये किमतीचे कपडे Clothes चोरटयांनी चोरून Stealing नेले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार-निझर रस्त्यावर काल मध्यरात्री आयशर ट्रक चालक संजय पाटील (रा. म्हसवे ता.पारोळा) हे त्यांच्या ताब्यातील वाहन ( क्र.एम.एच 18 बी.सी 7347 ) कपड्यांचे गठे घेऊन निझरकडे जात होते. त्यावेळी चोरटयांच्या टोळीने ट्रक अडवला. चालकासह मालकाचे हातपाय बांधून त्यांना सशस्त्रांनी मारहाण केली. या मारहाणरीत चालक व मालक जखमी झाले आहेत.

दरम्यान, मारहाण सुरू असताना चोरट्यांनी ट्रकमधील लाखो रुपये किमतीच्या कपड्यांचे गठ्ठे चोरून नेले. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी वाहन चालक संजय पाटील व ट्रकचे मालक किशोर पाटील यांना चौपाळे शिवारातील पेट्रोल पंपाजवळ फेकून दिले.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. उपनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, आधीच कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीडवर्षापासून व्यवसाय ठप्प झाले आहेत. काही महिन्यांपासून परिस्थिती पूर्वपदावर येत असतांना भररस्त्यावर अशाप्रकारे लुटीच्या घटना घडत असल्याने नागरिकांसह व्यापार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com