बोरद ता. तळोदा | वार्ताहर - nandurbar

बोरद येथे १५ दिवसापासून मोठया प्रमाणात वराहांचा मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी बोरद येथे भेट देवून तपासणी करून जंतु नाशक औषध उपचार केले. मात्र मृत्यू पावलेले वराह गावाचा चारही बाजुने फेकल्याने गावात दुर्गंधी येत आहे. गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

बोरद येथे एकाच दिवशी २०० वराह मेल्याचे खोडसाळ फोन थेट पशुसंवर्धन आयुक्तांना मागील १५ दिवसापूर्वी केला होता. त्यावेळी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यु.डी.पाटील यांनी बोरद येथे भेट देवून वराहांचे मालक रविंद्र गुजाळे, आंबालाल वडार, अजय गुंजाळे यांना भेटून जंतुनाशक औषध देवून मार्गदर्शन केले होते.

व बर्ड फ्लू विषयी खबरदारी घेवून जागृती करण्याचे आवाहन केले होते. मात्र अद्याप वराह मरण्याचे प्रमाण कमी न होता दिवसेंदिवस वाढत असल्याने गावकर्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. गावाचा चार ही बाजुला मेलेले वराह रस्त्यावर फेकून देत असल्याने त्याची दुर्गंधी संपूर्ण गवात येत आहे.

दुर्गंधीमुळे शेतकरी जंगलात जात नाही व मजूर वर्ग ही कामाला जात नाही. या १५ दिवसात २०० पेक्षा जास्त वराह मेल्याचे गावकर्यांना निर्दशनास आले असता काल दि.३० जानेवारी रोजी सरपंच वासंती ठाकरे, तथा पं.स. सदस्य विजयसिंग राजपूत, पत्रकार ग्रा.पं. सदस्य मगेश पाटील यांनी दुरध्वनीद्वारे पशुधन विकास अधिकारी बोरद डॉ. महेंद्र जमदाळे यांन गावातील परिस्थती त्यांना सांगितली.

लगेच बोरद येथे पशुधन अधिकारी (तळोदा) डॉ.जमदाळे व संजय बहिरम यांनी बोरद येथे येवून वराह मालकांना भेटून गावाचा चारही बाजुला फिरून भेट दिली.