सारंगखेडयातील ‘लळीत उत्सवा’ची शतकोत्तर परंपरा खंडीत

अध्यात्मिक व मनोरंजनाची जोड असलेल्या पौराणिक नाटयाला भाविक मुकणार
संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

सारंगखेडा । वार्ताहर- SARANDKHEDA

परंपरेची माहिती देत नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणार्‍या ‘लळीत उत्सवा’ची शतकोत्तर परंपरा यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खंडीत होणार आहे.

गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी होणार्‍या या धार्मिक, अध्यात्मिक व मनोरंजनाची जोड असलेल्या प्रसंगानुरुप पौराणिक नाट्य सादरीकरणाला यावर्षी भाविक मुकले आहेत.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजे सप्तमीला सायंकाळी दिवे लावण्यावेळी सुरु झालेली लळीत उत्सव सूर्योदयापर्यंत सुरु राहतो. तीनशे वर्षांपूर्वी संत नित्यानंदस्वामी महाराज यांनी सारंगखेडा येथील लोकांना लळीत हे प्रसाद रूपात दिले आहे.

लळीत पोथीचे व पौराणिक प्रसंगाचे जे व्यक्ती गायन, वाद्य, अभिनयाद्वारे प्रकटीकरणाचे काम करतील त्यांचे दुःख क्रीडा अनारोग्यापासून दूर राहिल असे म्हटले आहे. या श्रद्धेपोटी वर्तमानातदेखील ललित नाट्याचे सादरीकरण करून दरवर्षी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

आताची रास केवळ राग स्वरूपात प्रचलित आहे. गुजरांना प्रदेशात रास नृत्य व अभिनय आत्मक रूपात प्राप्त होते. पूर्वी धूरखेडा (ता.शहादा) येथील रास मंडळी प्रसिद्ध होती. श्रीकृष्ण भक्तिरसाने परिपूर्ण रास सागर आहे. ज्याची गायन परंपरा गुजर समाजातील लोकांमध्ये प्रचलित आहे अशाप्रकारे लळीत उत्सव आहे.

मात्र यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत होणारी गर्दी टाळण्यासाठी लळीत उत्सव होणार नाही. पौराणिक संदर्भासह नवीन माहिती देणार्‍या या ललित उत्सवाला यावर्षी परिसरातील नागरिक मुकले आहेत, अशी माहिती माजी प्राचार्य डॉ.डी.एन. पटेल यांनी दिली.

काय असते लळीत उत्सवात पौराणिक प्रसंगानुरूप नाट्य सादरीकरण यास ललित उत्सव म्हणतात. गावातील प्रमुख चौकात रंगमंचाद्वारे सादरीकरण केले जाते. अग्रभागी जळत्या मशालीच्या उजेडात रंगमंचावर प्रसंगाचे सादरीकरण केले जाते. लोकनाट्य लळीताचे कथानक साहित्यिक नाटकासारखे नसून ते स्थानिक लोकांच्या सामाजिक प्रतिभेवर बेतलेले असते. रामलीला रासलीला या रूपातून धार्मिक अनुष्ठान व मानव जीवनातील सुख दुःखमय प्रसंगाच्या वेळी गुजरानाच्या पुरुषवर्गाद्वारे रासची पदे काढली जातात. परिसरातील गावांमध्ये रास मंडळी असतात. झांज मृदुंगाच्या साज संगतीने विभिन्न रागात रास पदाचे गायन केले जाते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com