नंदुरबार : जिल्हयात दहा नवे रुग्ण

दोन रुग्णांचा मृत्यू ,14 जण करोनामुक्त
नंदुरबार : जिल्हयात दहा नवे रुग्ण

नंदुरबार- Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार येथे आज दहा कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 22 झाली आहे. दरम्यान, आज जिल्हयातील 13 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे नवे दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात आंबेडकरचौक नंदुरबार येथील 27 वर्षीय पुरुष, चौधरी गल्लीतील 67 वर्षीय पुरुष, आष्टे ता.नंदुरबार येथील 76 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, मिरानगर शहादा येथील 47 वर्षीय पुरुष, विवेकानंद चौक नवापूर येथील 45 वर्षीय पुरुष, देसाईपुरा येथील 71 वर्षीय पुरुष, सराफबाजारातील 48 वर्षीय पुरुष, जसोदापुरा शहादा येथील 46 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आंबेडकर चौकातील बाधीत रुग्णाला नाशिक येथून नंदुरबारला हलविण्यात आले आहे. आष्टे ता.नंदुरबार येथील 70 वर्षीय महिलेला काल रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तीचा रात्रीच मृत्यू झाला. तीचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आला. तसेच नंदुरबार येथील जुनी भोई गल्लीतील 60 वर्षीय पुरुषाचादेखील आज मृत्यू झाला. सदर इसमाला दि. 17 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हयात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 22 झाली आहे.

दरम्यान, जिल्हयातील 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नंदुरबार येथील देसाईपुरा, रायसिंगपूरा, तेलीवाडा, तलाठी कॉलनी, चौधरी गल्लीतील चार,पायलनगरातील एक, गुजरगल्ली शहादा, तसेच मंदाणे ता.शहादा व माळीवाडा ता.तळोदा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना आज जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्हयात एकुण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 437 झाली आहे. त्यापैकी 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 22 जणांचा मृत्यू झाला असून 138 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com