गणवेश वाटप व वृक्षारोपणाने साजरा झाला तहसिलदारांच्या कन्येच्या वाढदिवस

गणवेश वाटप व वृक्षारोपणाने साजरा झाला तहसिलदारांच्या कन्येच्या वाढदिवस

मंदाणे | Mandane वार्ताहर-

मानवी जीवन मिळणे हे खूपच भाग्यवानाचे प्रतीक मानले जाते आणि अशा मानवी जीवनात येऊन गरीब व गरजुंना मदत करायला मिळणे हेच मोठे भाग्य असते, असे प्रतिपादन शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी Shahada Tehsildar Dr. Milind Kulkarniयांनी मंदाणे (ता.शहादा) येथे केले.

मंदाणे (ता.शहादा) येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या खाजगी प्राथमिक विद्यामंदिर येथे तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी Shahada Tehsildar Dr. Milind Kulkarni यांच्या कन्येच्या अभीष्टचिंतानाच्या सोहळ्यानिमित्त नुकताच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन ऍड.प्रा.जे.टी.पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी सपत्नीक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक सुभाष पाटील, केंद्रप्रमुख एल.पी.परदेशी, आदर्श विद्यालयाचे प्राचार्य सी.बी.साळुंके, पर्यवेक्षक एम.जी.पाटील, जेष्ठ शिक्षक एस.एल.पाटील, दिलीप महाले, मुख्याध्यापिका अनिता पाटील, पत्रकार दिनेश पवार, कल्पेश राजपूत, गजानन चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, जन्माला येऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि मानव जन्मात येऊन समाजातील एका व्यक्तीने दुसर्‍या गरजू व्यक्तीला मदतीचा हात न दिल्यास त्या व्यक्तीचे जीवन सफल होत नाही.

माझ्या मुलीच्या अभीष्टचिंतानाच्या सोहळ्यानिमित्ताने का असेना माझ्या व माझ्या परिवाराकडून समाजातील अशा गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना काही तरी मदत करणे हे आम्ही आमचे भाग्यच समजतो, असे प्रतिपादन तहसीलदार कुलकर्णी यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.जे.टी.पवार, केंद्रप्रमुख परदेशी व मान्यवरांनी देणार्‍याकडे दातृत्ववृत्ती असली तर समाजातील गरीब व गरजू कधीच वंचीत रहाणार नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल राठोड यांनी केले. आभार प्रा.दिनेश पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक दिपक पवार व कर्मचारी किशोर पाटील आदींनी मेहनत घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com