प्रधानमंत्री आवास योजनेत तळोदा पंचायत समिती प्रथम

पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
प्रधानमंत्री आवास योजनेत तळोदा पंचायत समिती प्रथम

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी Guardian Minister Adv. K.C.Padvi यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण Flag hoisting करण्यात आले.

महाआवास अभियान ग्रामीण Mahawas Abhiyan Grameen अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तळोदा पंचायत समितीस प्रथम, शहादा द्वितीय आणि नंदुरबार पंचायत समितीस तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेसाठी नवापूर पंचायत समितीस प्रथम, नंदुरबार द्वितीय आणि शहादा पंचायत समितीस तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला

यावेळी जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणार्‍यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तळोदा पंचायत समितीस प्रथम, शहादा द्वितीय आणि नंदुरबार पंचायत समितीस तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेसाठी नवापूर पंचायत समितीस प्रथम, नंदुरबार द्वितीय आणि शहादा पंचायत समितीस तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एकात्मिक महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरीसाठी मेडिकल सर्जिकल अ‍ॅण्ड डेन्टल हॉस्पिटल नंदुरबार, सुश्रूत नर्सिंग होम शहादा आणि पटेल सर्जिकल अ‍ॅण्ड एन्डोस्कोपी क्लिनीक नंदुरबार यांना अ‍ॅड.पाडवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कृषि संजिवनी महोत्सव अंतर्गत उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कामे करणार्‍या दिलीप गावीत, उमेश भदाणे, प्रविण गावीत या कृषि सहायकांना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उच्चतम फळबाग लागवड क्षेत्र करण्यासाठी कृषि सहायक प्रविण गावीत आणि उर्मिला गावीत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी अ‍ॅड.पाडवी म्हणाले, शासनाच्या प्रयत्नात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. कोरोना काळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान येाजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 43 हजार 581 नागरिकांच्या बँक खात्यावर एकूण 28 कोटी 72 लाख 62 हजार रुपये जमा करण्यात आले असून 64 हजार 344 आदिवासी कुटुंबांना खावटी कीट वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार 912 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, सुसज्ज ग्रंथालय, ट्रामा केअर सेंटर, आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृह इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती अशा विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सामुहीक प्रयत्नांच्या बळावर जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे सांगून शेतकर्‍यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनानुसार पीके घ्यावीत. शेतकर्‍यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. संकटकाळात शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ऑलिम्पिक स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी भारतीय खेळाडुंचे त्यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील युवक-युवतींमध्येदेखील खेळात पुढे जाण्याची क्षमता असून त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पाडवी यांनी देशाच्या स्वातंत्र्यांसाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिल्याचे सांगितले. शहीद शिरीषकुमार आणि त्याचे साथीदार, रावलापणी येथे हौतात्म्य पत्करलेले स्वातंत्र्य सैनिक, चिमठाणा येथे इंग्रजी खजिन्याची लुट करणारे स्वातंत्र्य सैनिक, बिरसा मुंडा आणि अन्य आदिवासी स्वातंत्र्य योद्ध्यांचे योगदान मोलाचे असल्याचे ते म्हणाले. देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला माजी आ.चंद्रकात रघुवंशी, जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, महेश सुधळकर, बालाजी क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com