तुका म्हणे येथे भजन प्रमाण... म्हणतांना ह.भ.प. ताजुद्दीन महाराजांना हृदयविकाराचा झटका

जामदे येथील घटना
तुका म्हणे येथे भजन प्रमाण... म्हणतांना ह.भ.प. ताजुद्दीन महाराजांना हृदयविकाराचा झटका

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार व धुळे (dhule and nandurbar )जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या साक्री तालुक्यातील जामदे गावात कीर्तन करतांनाच मुस्लीम कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दिन महाराज शेख (tajuddin maharaj sheikh)यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे.

तुका म्हणे येथे भजन प्रमाण... म्हणतांना ह.भ.प. ताजुद्दीन महाराजांना हृदयविकाराचा झटका
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

जामदे गावात गेल्या आठवड्यापासुन ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू होता. सकाळी ज्ञानेश्वरी पारायणानंतर रोज रात्री वेगवेगळ्या कीर्तनकारांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोमवारी रात्री सप्ताहाचा सहावा दिवस होता.

या निरुपणाला मुस्लीम समाजाचे कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दीन आले होते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण हे प्रमाणाचे चिंतन मांडत असताना ह.भ.प. ताजुद्दीन महाराजांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे ते थोडा वेळा खाली बसले, त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एका भाविकाच्या मांंडीवर त्यांनी डोके ठेवले.

बाबा जालना जिल्ह्यातील

यावेळी कीर्तन सुरुच होते. थोडयावेळानंतर त्यांना नंदुरबार येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे बोदलापुरी आश्रमाकडे पाठवण्यात आले.

वारकरी संप्रदाय स्विकारला

एका मुस्लीम समाजातील नामवंत कीर्तनकाराचा कीर्तनाच्या व्यासपीठावर झालेला शेवट चर्चेचा विषय ठरला.

ह.भ.प. ताजुद्दिन महाराज हे मुस्लिम समाजाचे असले तरी वारकरी संप्रदायाची जीवनशैली त्यांनी अंगिकारली होती. वारकरी संप्रदायात मुस्लिम समाजाचा कीर्तनकार म्हणून त्यांची मोठी ख्याती होती.

हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा याबाबत त्यांनी सदैव जनजागृती केली. मूळचे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोदलापुरी गावचे रहिवाशी होते. पैठणमध्येही त्यांचा एक आश्रम आहे. त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार-प्रचाराचे काम केले जाते.

Related Stories

No stories found.