जिल्हयात पाच हजार संशयितांंची स्वॅब तपासणी
नंदुरबार

जिल्हयात पाच हजार संशयितांंची स्वॅब तपासणी

51 जण संसर्गमुक्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यातील 51 रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील 5 हजार संशयित रुग्णांंच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे.

त्यापैकी 859 रूग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यापैकी 47 जणांचा मृत्यू झाला असून 560 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 206 रूग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळला नसल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यातच आज जिल्ह्यातील 51 कोरोना रूग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात नंदुरबार तालुक्यातील सर्वाधिक 41 रूग्ण आहेत.

शहादा येथील 6, तळोदा येथील 3 तर नवापूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार संशयित रुग्णाच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 859 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

3 हजार 950 रुग्णांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 47 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्णांपैकी 560 जण कोरोना संसर्गमुक्त झाला आहे तर 206 रूग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान आज 64 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून 169 जणांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com