मयत महेंद्र मधुकर पवार
मयत महेंद्र मधुकर पवार
नंदुरबार

सारंगखेडा : देऊर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

सारंगखेडा - देऊर - शहादा - Nandurbar - Shahada :

येथील महेंद्र मधुकर पवार या 26 वर्षीय युवकाने बेरोजगारीला कंटाळून आपल्या राहत्या घरात कोणीही नसताना आज दि. 19 रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास स्वयंपाक घराच्या खोलीत लोखंडी अँगलला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनला प्रवीण मधुकर पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुगड यांनी शवविच्छेदन केले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला. सदर युवक हा मनमिळावू स्वभावाचा होता. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल देवीदास नाईक करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com