म्हसावद : विद्युत वितरण कंपनीच्या पथकाला घेराव

म्हसावद : विद्युत वितरण कंपनीच्या पथकाला घेराव

म्हसावद - Shahada - वार्ताहर :

म्हसावद,ता.शहादा येथे घरगुती विजमिटर तपासणीच्या चार पथकांनी आज दि.25 रोजी भर दुपारी अचानक धाड टाकली.

दरम्यान अनेक उणीवा निदर्शनात आल्याने महिलांसह ग्रामस्थांनी पथकाला घेराव घातला. प्रश्नांची सरबत्ती केल्याने पथकवाल्यांनी गावातून काढता पाय घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसावद,ता.शहादा येथे दि.25 गूरूवार रोजी दुपारी एक वाजता अचानक विद्युत वितरण कंपनीच्या चार पथकांनी घरगुती मीटर तपासणीसाठी गावातील श्रीरामनगर भागात धाड टाकली.

यात धुळे, जळगाव, मालेगाव,नंदुरबार येथील पथक असल्याचे सांगीतले.चारही पथक मिळून वीस अधिकारी पदाधिकारी पथकात होते.त्यांच्या पथकात कोणकोण आहेत.नावांची विचारणा केली असता नावे सांगण्यास असमर्थता दर्शवली.

करोना कालावधी सुरू असून पथकातील अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. घरात महिला वर्ग असूनही विचारणा न करता घरात प्रवेश केला.

परवानगी आहे का,ओळखपत्र दाखवा,ग्रामपंचायतची परवानगी घेतली का,पथकात स्थानिक अधिकारी का नाही,गावाबाहेर आकड्या टाकून अवैध विज वापरतात तेथे कार्यवाही का करत नाही, अशी विचारणा केली.

उपसरपंच चिंतामण लांडगे यांनी आधीच लोक कोरोनामुळे हैराण आहेत,निसर्गाचा कोप यामुळे कर्जबाजारीत बुडाला आहे,शेतात वेळेवर वीज नाही.

याबाबत विचारणा केली.नियमानुसार कार्यवाही करा असेही सांगीतले.दरम्यान महिला वर्ग जास्त संतप्त झाल्या होत्या.ग्रामस्थांनी प्रश्नाची सरबत्ती केली त्यास समाधानकारक ऊत्तरे न देवू शकल्याने वातावरण तापले. वातावरण तापते आहे हे पाहून पथकवाल्यांनी गावातून काढता पाय घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com