नंदुरबार

ठिबक सिंचन संचामध्ये अपहार; दोघांवर गुन्हा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शेतीसाठी उपयोगी असलेल्या 2 लाख 16 हजार रुपये किमतीचे पीव्हीसी पाईप व ठिबक सिंचनामध्ये अपहार केल्याप्रकरणी दोंदवाडे येथील पाटील बंधुंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदखेडा येथील मधुकर सिताराम पाटील व साक्षीदाराने त्यांच्या मालकीची शेतजमिन सन 2015 पासून भाडेपट्टयाने राकेश मोहन पाटील, पंकज मोहन पाटील (रा.दोंदवाडे ता.शहादा) यांना शेती करण्यास दिली होती.

त्यावेळी मधुकर पाटील यांनी सिंचन व्यवस्थेसाठी 20 पीव्हीसी पाईप 6 व 16 एमएम चेे ठिबकचे 40 बंडल सदर शेतात टाकून दिले होते. पाटील बंधुंनी मधुकर पाटील यांना चालू हंगामाचे बोलीप्रमाणे भाडेपट्टयाचे पैसे दिले नाही.

म्हणून त्यांना शेताचा ताबा सोडून देण्यास सांगितले असता पाटील बंधुंनी त्यांच्याकडे एकुण 2 लाख 16 हजार रुपये किमतीची शेती उपयोगी सिंचन व्यवस्थेसाठी मालमत्ता पीव्हीसी पाईप व ठिबक सिंचन सोपविले. मात्र, पाटील बंधुंनी विश्वासघात करुन सदर मालमत्तेचा अपहार केला. म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com