मंदाणे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

संशयीतास अटक, गावात तणावामुळे लावला पोलीस बंदोबस्त
मंदाणे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शहादा - Shahada - ता.प्र :

मंदाणे (ता. शहादा) येथे एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस आमिष दाखवत विनयभंग केल्याची घटना (ता.9) दुपारी साडे चार ते साडेपाच दरम्यान घडली. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक केली आहे.

याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नी, तीन मुलांसह गावात मोलमजुरी करतो. नऊ जुलैला दुपारी बारा वाजेनंतर मुरूम भरण्याच्या कामाला गेलो होतो. तर पत्नी गावात भांडी धुणे कामी गेली होती. घरी लहान भाऊ व बहिनीला सांभाळायला माझ्या दहा वर्षाची मुलगी घरीच होती घरी कोणी नसताना गावातीलच इसम विश्वास रूपचंद साळुंखे याने 10 वर्षाच्या मुलीला पैशाचे आमिष दाखवून अंगलट करण्याचा प्रयत्न केला.

हा सारा प्रकार झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेनंतर आरोपी विश्वास साळुंके हा पुन्हा घराकडे आला त्याला बघुन मुलीने सारा प्रकार सांगितला माझ्या पत्नीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर प्रकार उघडकीस आला असे फिर्यादीत म्हटले आहे.

सदर घटनेचे वृत्त गावात पसरताच गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आरोपीला त्वरित अटक करावी अशी मागणी होती.

घटनास्थळी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी भेट देऊन गावातील लोकांना शांततेच्या आवाहन केले. पोलिसांनी आरोपी विश्वास रूपचंद साळुंके याला अटक करून त्याचे विरोधात कलम 354 अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे करीत आहेत.

दरम्यान गावात खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीसनिरीक्षक दीपक बुधवंत यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com