शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या मशरूम शेतीची पाहणी करताना दादा भुसे
शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या मशरूम शेतीची पाहणी करताना दादा भुसे
नंदुरबार

मशरुमच्या नाविन्यपूर्ण शेतीला कृषिमंत्री ना.दादा भुसे यांची भेट

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहादा - Nandurbar - Shahada - ता.प्र :

तालुक्यातील कहाटूळ येथील शेतकर्‍याने मशरूमची नाविन्यपूर्ण व शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्मिती केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीला अडचण येत आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर या प्रकल्पाला चांगले दिवस येतील. इतरही शेतकर्‍यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे केले.

तालुक्यातील कहाटूळ येथील शेतकरी घनश्याम पाटील यांनी एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत मशरूम उत्पादन प्रकल्प व मशरूम बीज उत्पादन ग्रीष्मा या प्रकल्पाला कृषी मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी आ.मंजुळा गावित, उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, गटविकास अधिकारी सी.टी.गोस्वामी, उपविभागीय कृषी अधिकारी बी.व्ही.जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी प्रदीप लाटे, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, विक्रांत मोरे, धुळ्याचे हिलाल माळी, मंडळ कृषी अधिकारी आर.एम.धनगर, कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल, कृषी सहाय्यक राहुल खेडकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव, रिसोर्स बँकेचे शेतकरी आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आंबा फळपिकाची लागवड श्री.भुसे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी श्री.भुसे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. जिल्ह्याला आदर्शवत असा प्रकल्प असून जिल्ह्यातील इतर शेतकर्‍यांनीही इथल्या बियाण्याचा वापर करून प्रकल्प कार्यान्वित करावा असे सांगितले.

शेतकर्‍यांनी काळजी करु नये

खताची टंचाई असेल तर येत्या चार-पाच दिवसात युरिया खताची पूर्तता केली जाईल. युरिया खताची जादा दराने विक्री किंवा लिंकिंग कोणी करत असेल तर शेतकर्‍यांनी याबाबत तक्रार केल्यास निश्चितच संबंधितांवर कारवाई केली जाईल. शेतकर्‍यांना आवश्यक तेवढा युरियाच्या साठा लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. शेतकर्‍यांनी काळजी करू नये असे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, एकाच वेळी सर्वत्र खताची मागणी झाली.

त्यातच कोरोनाचे संकट आल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली. परंतु आवश्यक तेवढा युरिया उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. याबाबत केंद्र शासनाकडे जास्तीचा युरिया खताची मागणी केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे राज्याची संपूर्ण परिस्थिती मांडली असून तातडीने जास्तीचा युरिया उपलब्ध करून वाहतुकीची समस्या सोडवावी अशीही विनंती केंद्राकडे केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी पंचायत समिती सदस्य विजय पाटील यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com