बिलाडी येथे विनापरवाना टेकडीचे खोदकाम

बिलाडी येथे विनापरवाना टेकडीचे खोदकाम

सारंगखेडा - Sarangkheda - वार्ताहर :

बिलाडी (ता.शहादा) येथे गौण खनिज उपसा करण्यासाठी सुमारे अडीचशे वर्षापासून असलेल्या भवानीमाता मंदिराची टेकडी

गावातील कुलदैवत मनुदेवी डोंगरावर आहे. त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून डोंगर फोडून अवैधरित्या दगड पोखरण्यात येत आहे. मंदिराकडे जाण्यासाठी रस्ताही बंद करण्यात आला होता. याबाबत महसूल विभागाकडे तक्रार केली होती. संबंधितांनी रस्ता बनवून दिला. मात्र, रस्त्यालगत डोंगरावर ब्लास्टींग केली जात असल्याने दगड उधळून मंदिरापर्यंत दगड येत आहेत. या दगडामुळे भाविकांना किंवा मूर्तीवर दगड येऊ शकतो, याबाबत तक्रार केली आहे.

- रामचंद्र निकूम, माजी सरपंच त. बिलाडी.

खोदण्यात येत असून शासनाची कोणतीही परवानगी न घेता टेकडीवर ब्लास्टींग केली जात असल्याने मंदिरांपर्यंत दगड येत असल्याने मंदिराकडे येणार्‍या भाविकांना धोका निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

देवी, देवतांची मंदिरे खुले करण्यासाठी राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. मात्र बिलाडी (ता.शहादा) गावापासून तीन किलोमिटर अंतरावरील वरूळ कानडी वरील टेकडीवर कुलदैवत मनुमातेच्या मंदिराकडे डोंगरावरुन जाणार्‍या रस्त्याजवळ अवैध गौण खनिज उपसा करणार्‍यांकडून रात्रंदिवस मनुमातेची टेकडी फोडण्याचा प्रयत्न होत आहे.

टेकडीवर दगड फोडण्यासाठी ब्लास्टींग केली जात असल्याने दगड उधळून रस्त्यांवर , मंदिरापर्यंत येत असल्याने मंदिराकडे ये-जा करणार्‍या भाविकांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत भाविकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदन दिले आहे.

अडीचशेवर्ष पूर्वीचे मंदिर

बिलाडी (ता.शहादा) येथे गावापासून तीन किलोमिटर अंतरावर कुलदैवत मनूदेवी (भवानी माता) मातेचे मंदिर वरुळकानडी टेकडीवर आहे.

अडीचशे वर्षापूर्वीचे असून पाषाणची स्थापना पूर्वजांनी केली होती. या ठिकाणी मनोकामना पूर्ण होतात. या मातेच्या दर्शनासाठी तीन राज्यातील भाविक येतात. एप्रिल महिन्यात चतुर्थीला यात्रा भरते.

गेल्या पन्नास वर्षापूर्वी मंदिराचा जिर्णोधार करुन संगमरवरी मूर्तीची स्थापना केली होती. मात्र, याठिकाणाहून अवैधरित्या टेकडीचे खोदकाम सुरु असून कुठलीही परवानगी न घेता ब्लास्ट केला जात असल्याने नागरिकांसह भाविकांना धोका निर्माण झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com