कोठडा (ता.नवापूर)  शिवारातील बायोडिझेल पंपावर सिल करण्यात आलेली मशिनरी
कोठडा (ता.नवापूर) शिवारातील बायोडिझेल पंपावर सिल करण्यात आलेली मशिनरी
नंदुरबार

कोठडा येथील बायाेडिझेल पंप पुन्हा सील

नाहरकत दाखल्याबाबत लावले जाताहेत विविध तर्कवितर्क

Rakesh kalal

नंदुरबार । प्रतिनिधी NANDURBAR

जिल्हाधिकार्‍यांचा नाहरकत दाखला नसल्यामुळे नवापूर तालुक्यातील कोठडा येथील दोन बायोडिझेल पंप दि.26 जुलै रोजी सिल करण्यात आले होते. परंतू संबंधीत पंपचालकाने दि.28 जुलै रोजी अचानक नाहरकत दाखला सादर केल्याने पंप पुन्हा सुरु करण्यात आला.

त्यामुळे दोनच दिवसात नाहरकत दाखला आला कुठून असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याबाबत दैनिक देशदूतमध्ये दि. 31 जुलै रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेवून हे पंप पुन्हा सिल करण्यात आले असून पंपचालकाने सादर केलेल्या नाहरकत दाखल्याची पडताळणी करण्यात येत आहे.

पंपचालकाला सात दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले आहेत. दरम्यान, संबंधीत पंपचालकाने सादर केलेले नाहरकत पत्र बनावट होते की खरे याबाबत चौकशी करण्यात येत आहे. याबाबत दोष सिद्ध झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील बायोडिझेल पंप चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी नसतांनाही डिझेल विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवापूर तहसीलदारांनी तालुक्यातील कोठडा येथील दोन बायोडिझेल पंप अत्यावश्यक कागदपत्रे नसल्याने दि.26 जुलै रोजी सिल केले होते.

कोठडा (ता.नवापूर) शिवारातील बायोडिझेल पंपवर नवापूर तहसिलदार व नवापूरच्या पोलिस उपनिरीक्षकांनी तपासणी केली होती, त्यावेळी संबंधीत पंप चालकाकडे पंप चालविण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने, ना हरकत दाखले मिळून आलेले नव्हते.

तपासणीप्रसंगी पंपमालक उपस्थित असताना ते कागदपत्रे सादर करू शकले नव्हते. त्यामुळे सक्षम अधिकार्‍यांनी त्या डिझेल पंपाला सिल केले होते. मात्र दोनच दिवसात म्हणजेच दि.28 जुलै रोजी सदर पंपाला लावलेले सिल उघडून पंपावर बायोडिझेलची विक्री पूर्ववत सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत येत होते.

उपलब्ध माहितीनुसार संबंधीत पंपमालकाने एकाच दिवसात मुंबईला जाऊन तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांकडून मागील तारीख नमुद करून ना हरकत दाखला आणल्याची चर्चा सुरु होती. सदर नाहरकत दाखले व इतर कागदपत्रे तहसीलदारांना सादर केली आणि पंपला लावलेले सील 28 जुलैला काढून घेतल्याची चर्चा होती.

याबाबत दैनिक देशदूतमध्ये दि.31 जुलै रोजी “ सिल केलेले नवापुरातील दोन बायोडिझेल पंप पूर्ववत, दोन दिवसात ‘एनओसी’ आली कशी?” या मथळयाखाली वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेवून जिल्हा प्रशासनाकडून नवापूर तहसिलदारांना याबाबतची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार काल दि. 4 ऑगस्ट रोजी नवापूर तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोठडा येथे पुन्हा भेट देवून तेथील कागदपत्रांची तपासणी केली. त्यांनी सादर केलेल्या नाहरकत दाखल्याचीही चौकशी करण्यात येणार आहे. परंतू पंपचालकाकडे कागदपत्रे अपूर्ण असल्याचे आढळल्याने पंप पुन्हा सिल करण्यात आला आहे. संबंधीत पंपचालकाला सात दिवसाच्या आत सर्व संबंधीत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे पंपचालकाने सादर केलेला नाहरकरत दाखला हा खरा आहे की बनावट याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. हा नाहरकत दाखला बनावट असल्यास संबंधीत पंपचालकावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होवू शकता. जर हा दाखला जिल्हाधिकारी कार्यालयातून दिला गेला असल्यास तो कोणी दिला, त्यावर कोणाची सही आहे, दोनच दिवसात पंपचालकाने हा दाखला आणला कोठून? असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित करण्यात येत आहे.

याबाबत दैनिक देशदूतमध्ये दि.31 जुलै रोजी “ सिल केलेले नवापुरातील दोन बायोडिझेल पंप पूर्ववत, दोन दिवसात ‘एनओसी’ आली कशी?” या मथळयाखाली वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेवून जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि.4 ऑगस्ट रोजी नवापूर तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोठडा येथे जावून तेथील कागदपत्रांची तपासणी केली. परंतू पंपचालकाकडे कागदपत्रे अपूर्ण असल्याचे आढळल्याने पंप पुन्हा सिल करण्यात आला आहे. संबंधीत पंपचालकाला सात दिवसाच्या आत सर्व संबंधीत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

देशदूत वृत्ताची दखल

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com