अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

दोषारोप दाखल झाल्यापासुन 62 दिवसात आरोपीला मिळाली शिक्षा
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी न्यायालयाने ठोठावली जन्मठेप
शिक्षा

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

आई व वडिल शेतात गेल्याने घरी कुणी नसल्याची संधी साधुन अल्पवयीन मुलीस (minor girl) त्यांच्या घराच्या गच्चीवर घेवुन जावुन तिच्यावर बलात्कार (Rape) केल्या प्रकरणी आरोपीस नंदुरबार न्यायालयाने (Nandurbar Court) जन्मठेप (life imprisonment) व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा (penalty) ठोठावली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनिल साकर्‍या गावीत रा . जामनपाडा , ता . नवापुर हा दि . 1 जुन रोजी 2021 रोजी गावात उजेड्या देवाचा कार्यक्रम असल्याने प्रत्येक घरी मटनाचा वाटा दिला जातो . यातील फिर्यादी हिचा मटनाचा वाटा घेवुन यातील आरोपीत हा पिडीत अल्पवयीन मुलीचे आई वडिलास देण्यासाठी आला असता पिडीत हिचे आई वडिल यांनी मटनाचा वाटा घेवुन तो यातील पिडीत हिचे आजी कडे दिला व शेतात निघुन गेले असता त्याची संधी साधुन यातील आरोपीत मजकुर याने पिडीत अल्पवयीन मुलीस तीच्या नविन घराचे छतावर नेवुन बलात्कार केला . याप्रकरणी फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 376 ( आ ) ( ब ) सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे सुनिल साकर्‍या गावीत यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेवुन विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि नितीन सुदाम पाटील यांनी तपास स्वत : कडे घेवुन विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोसई भुषण बैसाणे , पोकॉ नितीन सोनवणे , पोकॉ अतुल पानपाटील , पोकॉ अनिल राठोड यांच्या सह तात्काळ आरोपीस ताब्यात घेतले . तसेच तपासी अधिकारी यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवुन न्यायालयात 42 दिवसाचे आत आरोपीतांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले . प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नंदुरबार आर.एस. तिवारी यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड . व्ही . सी . चव्हाण यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने एकुण 7 साक्षीदार तपासण्यात आले . न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा तसेच अतिरीक्त सरकारी वकिल ही , सी , चव्हाण यांचा युक्तीवाद व पिडीत अल्पवयीन मुलीची साक्ष महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने आरोपी सुनिल साकर्‍या गावीत याला जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली . विशेष म्हणजे न्यायालयाने सदर आरोपीस दोषारोप दाखल झाल्या पासुन 62 दिवसात शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी काम पाहिले .

Related Stories

No stories found.