अवैध दारु विकणार्‍या ढाब्यावर धाड

असलोद-मंदाणा रस्त्यावर पोलिसांची कारवाई
अवैध दारु विकणार्‍या ढाब्यावर धाड

शहादा - Shahada - ता.प्र :

तालुक्यातील असलोद शिवारातील मंदाणा रस्त्यावर अवैध दारू विक्री करणार्‍या ढाब्यावर असलोद दूरक्षेत्राच्या पोलिसांनी छापा टाकत सुमारे 12 हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे.

याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असलोद ग्रामस्थांनी दारूबंदी व्हावी यासाठी विविध पोलीस स्टेशन तसेच नाशिक विशेष महानिरीक्षक व विभागीय राज्य उत्पादन विभागाच्या आयुक्तांना याबाबतचे निवेदन दिले होते.

याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबर रोजी प्रमोद भिलेसिंग राजपूत (वय36, रा.असलोद), सुभाष ताराचंद पवार हे दोघे त्यांच्या मालकीच्या असलोद-मंदाणा शिवारातील ढाब्यावर अवैधरीत्या दारू विक्री व बाळगतांना मिळून आले.

यात विविध कंपनीची ब्लू व्हिस्की, मॅकडॉल, डिप्लोमॅट, देशी टँगो आदी प्रकारची सुमारे 12 हजार रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.

याबाबत शहादा पोलिस स्टेशनचे रमेश एम. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी असलोद दूरक्षेत्राचे पो.कॉ. अमृत विनायक पाटील, नंदकिशोर सानप यांच्या फिर्यादीवरून प्रमोद राजपूत, सुभाष पवार या दोघांविरुद्ध शहादा पोलिस ठाण्याअंतर्गत असलोद पोलीस दूरक्षेत्रात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कॉ. दिपक परदेशी,पोकॉ. काळूराम चौरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com