नवापूर | श.प्र.- nandurbar

नवापूर शहरात राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षातर्फे वाढत्या पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

शहरातील पेट्रोल पंपासमोर घोषणा बाजी करत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुरज गावीत,नगरसेवक खलील खाटीक,युवा नेता आकाश गावीत,प्रितेश गावीत,अमर गावीत,मुद्दतसिर सैय्यद,मोसीम खान,अमर गावीत,आनंद गावीत,आशिष गावीत,स्तवन वसावे,एजल गावीत सह असंख्य युवक कॉग्रेसचे पदधिकारी उपस्थित होते.

यावेळी युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुरज गावीत म्हणाले की २०१४ मध्ये निवडणुक ज्या मुद्दयावर भाजप सरकार निवडणुन आली त्यांच मुद्दयांचा,घोषणा व आश्वासनांचा विसर या भाजप सरकारला पडला आहे.

ते मुद्दे आठवण करुन देण्यासाठी व सामान्याचा खिशाला पडत असलेली अतिरिक्त मार रोखण्यासाठी आज युवक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे संपुर्ण राज्यभर हे आंदोलन आम्ही करत आहोत.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शनखाली पो हे कॉं निजाम पाडवी,प्रमोद पाठक,चंद्रशेखर चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.