नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

खापर ता.अक्कलकुवा येथे 6 लाख 75 हजार 570 रुपयांची 32 हजार 412 युनीट वीजेची चोरी केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. याबाबत एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खापर ता.अक्कलकुवा येथील देविचंद सोनराज जैन यांनी अप्रामाणिकपणे व विश्वासघाताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीज चोरी करुन गेल्या दोन वर्षापासून 32 हजार 412 युनीटची वीज चोरी केली आहे.

या वीजचोरीची किंमत 6 लाख 53 हजार 570 असून तडजोड आकार 22 हजार अशी एकुण 6 लाख 75 हजार 570 रुपये इतकी रक्कम त्यांच्याकडून येणे बाकी आहे.

त्यांना महावितरण कंपनीकडून वीज चोरी व तडजोडीचे देयक देण्यात आले आहे. परंतू अद्याप त्याचा भरणा केलेला नाही.

म्हणून भरारी पथकाचे बकुळ रामदास मानवटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जैन यांच्याविरुद्ध विद्युत कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ गुलाब जोहरी करीत आहेत.