पोलीसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग

पोलीसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

येथील शहर पोलीस ठाण्यासमोर तालुका क्रीडा संकुलाच्या आवारात पोलीसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांना आज दुपारी अचानक आग लागून दोन वाहने खाक झाली असून दोन वाहनांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासमोरील तालुका क्रीडा संकुलाच्या आवारात पोलीसांनी विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली वाहने उभी केली आहेत.

दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक या वाहनांमधून धूर निघत असल्याचे काही पोलीसांच्या लक्षात आले. वाहनांजवळ जावून पाहिले असता वाहनांनी पेट घेतला असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोहेकॉ भटू धनगर, हेमंत बारी, अतुल बिरारे, जगदीश पवार, रवी पवार आदींनी मिळेल त्या साहित्याने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

मात्र आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत एका वाहनाची आग पोलीसांनी शर्थीचे प्रयत्न करुन विझवली. मात्र दुसर्‍या वाहनाला लागलेली आग अग्निशमन दलाच्या पथकाने विझविल्याने पुढील अनर्थ टळला.

सदर आगीत वाहन क्र.(एम.एच.12 एएफ 3127), टाटा सुमो कार जळून खाक झाली. तसेच जवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टर व आणखी एका वाहनाला याची झळ बसली. मात्र पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com