धुरखेडयाच्या शेतकर्‍यांकडून स्वखर्चाने गोमाईच्या पात्रात नांगरटी

जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न
धुरखेडयाच्या शेतकर्‍यांकडून स्वखर्चाने गोमाईच्या पात्रात नांगरटी

शहादा Shahada । ता.प्र.-

तालुक्यातील धुरखेडा Dhurkheda येथील शेतकर्‍यांनी farmers एकत्र येत स्वखर्चाने गावालगत असलेल्या गोमाई नदीपात्रात Plowing in Gomai 21 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करुन जमिनीत पाणी पातळी Water level वाढवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या समतोल ढासळल्याने अवेळी, पुरेसा पाऊस पडत नसल्याने बारमाही वाहणार्‍या नद्या काही काळापुरत्याच वाहू लागल्या आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. जमिनीत पाण्याची पातळी वाढावी यासाठी गोमाई नदीपात्रात नदी नांगरटीचा प्रयोग सर्वप्रथम 2000 साली नगराध्यक्ष मोतीलालतात्या पाटील यांनी स्वखर्चाने डामरखेडा परिसरात केला.

त्यामुळे परिसरातील अनेक विहिरी व कूपनलिकांना पाणी आले. नदी नांगरल्यामुळे नदीत असलेले खडी, मुरूम, खडकाळ जागा नरम झाल्यामुळे पावसात आलेले पाणी नागरटी केलेल्या भागात जिरल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली.

या उपक्रमाची तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन नदी नागरटी प्रकल्पाची विस्तृत माहिती घेऊन राज्यात हा उपक्रम सुरू केला होता. दोन वर्षापासून अल्प प्रमाणात पाऊस होत आहे.

यावर्षी तर निम्मे पावसाळा निघून गेल्यानंतरदेखील सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झालेले आहेत. सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. ऑगस्ट महिना येऊनदेखील पुरेश्या पावसाअभावी नदी कोरडी आहे.

येणार्‍या दिवसात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी धुरखेडा गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन गोमाई नदीपात्रात ट्रॅक्टर टाकून नांगरटीचा उपक्रम सुरु केला. या अभियानाची सुरुवात शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

21 ट्रॅक्टरद्वारे नांगरटी

गोमाई नदीपात्रात सुमारे 21 ट्रॅक्टरद्वारे नदी नांगरटी उपक्रम ग्रामस्थांनी सुरू केला आहे. यात नदीपात्रात सुमारे दीड ते दोन फूट खोल नांगरटी करण्यात आली आहे. नदी नांगरटीकरिता ट्रॅक्टर मालक स्वतः व ग्रामस्थांनी डिझेल खर्च करून हा उपक्रम राबवला आहे.

या उपक्रमामुळे धुरखेडा, लांबोळा, करजई, बुपकरी, डामरखेडा, भादा, प्रकाशा यासह परिसरातील शेकडो एकर जमिनीतील कूपनलिका, विंधन विहिरींना पाण्याच्या समस्या भविष्यात सुटणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com