कोळदा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात 11 बचत गटांचा सहभाग

कोळदा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात 11 बचत गटांचा सहभाग

नंदुरबार Nandhurbar । प्रतिनिधी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त World Tribal Day कृषि विज्ञान केंद्र, कोळदा ता.जि.नंदुरबार येथे कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा Department of Agriculture Agricultural Technology Management System (आत्मा) व कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे Ranbhaji Mahotsava आयोजन करण्यात आले .

यावेळी कृषि विज्ञान केंद्र, कोळदा ता.नंदुरबार येथील डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे , प्रमुख विभागीय विस्तार केंद्राचे डॉ.एम.एस.महाजन , डॉ.हेडगेवार सेवा समितीचे सल्लागार ललीत पाठक , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे आदी उपस्थित होते.

रानभाजी महोत्सवामध्ये प्रस्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले. यावेळेस नंदुरबार जिल्ह्यात रानभाज्या मुबलक प्रमाणात असुन त्यावर विक्री व्यवस्थापन साखळी व प्रक्रिया उद्योग उभी करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले, रानभाज्या महोत्सव सारख्या कार्यक्रमातुन रानभाज्या संकलन व संवर्धनाचे कार्य वाढीस लागते असेही त्यांनी व्यक्त केले .

कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार चे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी जैवविविधता संवर्धनाचे महत्व सांगितले.नंदुरबार जिल्ह्यातील रानभाज्या तसेच जैवविविधता यातील प्रयोगांची मांडणी केली. प्रयोगशील शेतकरी रामसिंग वळवी, कंजाला ता.अक्कलकुवा यांनी स्थानिक स्तरावर रानभाज्या महोत्सवाची उपयुक्तता सांगितली.

विभागीय विस्तार केंद्राचे डॉ.मुरलीधर महाजन यांनी सद्यास्थितील पिक व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच बदलत्या हवामानाची परिस्थितीत पिक व्यवस्थापनात आवश्यकते बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे यांनी रानभाज्या म्हणजे सुपोषणाचे वरदान असुन रानभाज्यांचा आहारात समावेश करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले . अध्यक्षीय भाषणात कृष्णदास पाटील यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन शेतीच्या विकासासाठी विविध उपक्रम चालु असल्याचे व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसारासाठी संलग्न विभागांशी समन्वय साधुन अधिकाधिक तंत्रज्ञान प्रसाराचे काम करण्याबाबत आशावाद व्यक्त केला .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि विज्ञान केंद्र , कोळद्याचे जे.एन.उत्तरवार व आभार प्रदर्शन पी.सी.कुंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी , नवापुर बापु गावीत , प्रभारी तालुका कृषि अधिकारी , नंदुरबार स्वप्नील शेळके , तंत्र अधिकारी व्ही.डी.चौधरी आदींनी प्रयत्न केले . रानभाजी महोत्सवामध्ये रानभाज्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .

सहभागी 11 बचत गटातील 42 पुरुष व महिलांना सहभाग प्रमाणपत्र व रानभाजी पुस्तिका देण्यात आले . यावेळी बांबु पासुन कमी खर्चाचे सोलर ड्रायर बनविणार्‍या कंजाला ता.अक्कलकुवा येथील सायसिंग वळवी यांना गौरवण्यात आले. कृषि विज्ञान केंद्र , कोळदा प्रक्षेत्रावरावरील विविध प्रात्यक्षिकांना व रानभाजी प्रदर्शनास मान्यवरांनी भेटी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com