Video : नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन नर्स संकल्पना राज्यासाठी पथदर्शी

Video : नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन नर्स संकल्पना राज्यासाठी पथदर्शी

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हयात हवेपासून ऑक्सीजन निर्मितीचा प्लांट यशस्वी झाल्यानंतर ऑक्सीजनचा योग्य वापर व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन नर्स हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमाची दखल आरोग्य मंत्र्यांनी घेतली असून हा पॅटर्न आता राज्यभर राबविण्याच्या सुचना ना.राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

ऑक्सिजन नर्स हा प्रकल्प आपण गेल्या आठ महिन्यांपासून राबवतो आहोत. ऑक्सिजन लावलेले रुग्ण अनेकवेळा नळी काढून बाहेर फिरतात. वॉशरुममध्ये जातात. मात्र त्यांना लावण्यात आलेल्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरुच असतो. त्यामुळे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर वाया जात असतो. त्यामुळे ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबवली. प्रत्येकी २० रुग्णांसाठी एक ऑक्सीजन नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नर्स त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी दर तासांनी प्रत्येक रुग्णाची ऑक्सीजन पातळी तपासते, ज्यांना गरज असेल त्यांना पुरवठा वाढवला जातो व ज्यांना आवश्यकता नाही त्यांचा ऑक्सीजन पुरवठा कमी केला जातो. त्यामुळे ऑक्सीजनची बचत होत असते. यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांची टीम पूर्णपणे समर्पित होवून कार्य करीत होती, त्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी होवू शकला. त्याची राज्य शासनाने दखल घेतली, ही नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.

डॉ. राजेंद्र भारुड ,जिल्हाधिकारी, नंदुरबार.

आरोग्य, शिक्षण यापासून मागासलेला जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. कर्मचार्‍यांच्या अभावामुळे आधीपासूनच आरोग्य व्यवस्था तोकडी आहे. कोवीड काळात संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असतानाही जिल्ह्यात हवे पासून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट तयार करून रुग्णांना त्याचा योग्य वापर करून बचत कशी होईल यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात कमी कर्मचार्‍यांमुळे ऑक्सीजन नर्स हा स्तुत्य प्रयोग राबविण्यात आला.

डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक ,जिल्हा रुग्णालय

करोनाच्या महामारीमुळे सद्यस्थितीत ऑक्सिजनला मोठया प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.

त्यामुळे ऑक्सिजनची ही गरज ओळखून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दूरदृष्टी ठेवत तोकडी आरोग्य यंत्रणा असतांनाही नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दोन व शहाद्यातील कोविड केअर सेंटरलगत एक असे तीन ऑक्सविशेष म्हणजे या तीनही प्रकल्पांमध्ये नैसर्गिक हवेतून ऑक्सीजन निर्मिती होत असल्यामुळे बाहेरुन लिक्वीड ऑक्सीजन लावण्याची गरज नाही. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रुग्णांसाठी आवश्यक असणार्‍या एकूण ऑक्सिजनपैकी ५० टक्के गरज भागवली जात आहे.

येत्या काही दिवसात नवापूर व तळोदा येथे ऑक्सिजन प्रकल्प प्रस्तावित असून जिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जम्बो प्रकल्पाच्या निर्मितीला सुरुवात झाल्याने मे महिन्यात जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.िजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले आहेत.

एका प्रकल्पातून सुमारे १२५ जम्बो सिलीडर इतकी ऑक्सिजन निर्मिती होत असून तिघा प्रकल्पातून ३७५ जम्बो ऑक्सिजन सिलींडर निर्मिती होत आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात एकूण मागणीच्या सुमारे ४० ते ५० टक्के ऑक्सिजन निर्मिती होत आहे.

सध्या जिल्ह्याच्या सर्व शासकीय रुग्णालय आणि कोरोना कक्षांना सुमारे १००० ते १२०० जम्बो सिलींडरची गरज आहे. यापैकी सुमारे ४०० सिलींडर नंदुरबार व शहाद्यामध्येच निर्माण होत आहेत. तर उर्वरित गरज ही धुळे, औरंगाबाद, गुजरात व मध्यप्रदेशातून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करुन भागवली जात आहे.

सध्या नंदुरबार जिल्हा रुग्णालयात २००, शहादा येथे १००, नवापूर येथे ८० तळोद्यात ५० ऑक्सिजन बेड असे सुमारे पावणे चारशे ते चारशे ऑक्सिजन बेड आहेत.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणारे दोन प्रकल्प तर शहादा येथील कोविड केअर सेंटरमध्ये एक प्रकल्प कार्यान्वित आहे. यातून शहादा व नंदुरबारची ऑक्सिजनची गरज भागवली जात आहे. तर नवापूर व तळोदा येथेही दोन प्रकल्प प्रस्तावित असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

दरम्यान, हवेतून ऑक्सीजन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ऑक्सीजनचा योग्य वापर व्हावा यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन नर्स हा प्रयोग राबविला जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाच्या दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी हवेपासून ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करण्यात आली.

त्याचबरोबर ऑक्सीजनचा योग्य वापर व्हावा यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सीजन नर्स ही संकल्पना राबविली जात आहे. रुग्णाला लावलेल्या ऑक्सीजनची पातळी तपासण्यासाठी प्रत्येक वीस रुग्णांसाठी एक ऑक्सीजन नर्स नेमण्यात आली आहे.

सदर नर्स ही तिला नेमून दिलेल्या २० रुग्णांचा दर तासाला ऑक्सीजन तपासणार आहे. ज्या रुग्णाला ऑक्सीजनची अधिक गरज आहे, त्याला अधिकचे ऑक्सीजनची पातळी वाढविणे, तर ज्याला कमी ऑक्सीजनची गरज आहे

त्याला लावलेल्या मशिनमधून ऑक्सीजनचा फ्लो कमी करणे, एखादा पेशंट बाथरुमला गेला त्याचा ऑक्सीजन पुरवठा बंद करणे, अशी डयुटी या नर्सला देण्यात आली आहे. या संकल्पमुळे योग्य तेवढाचा ऑक्सीजन संबंधीत रुग्णाला दिला जाणार असल्याने ऑक्सीजनच बचत होणार असून बचत झालेला ऑक्सीजन दुसर्‍या रुग्णाच्या कामी येणार आहे.

नंदुरबार जिल्हयात प्रायोगिक तत्वावर राबविलेल्या या संकल्पनेची राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेवून हा प्रयोग राज्यात सर्वत्र राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. ही संकल्पना राबविणार्‍या जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये व सर्व पथकांचे कौतूक करण्यात येत आहे.

एकूणच नंदुरबार जिल्ह्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य व्यवस्थेने उभारलेला ऑक्सीजन प्लांट व त्याचा योग्य वापर करून बचतीसाठी केलेला ऑक्सिजन नर्सचा प्रयोग आता राज्यात नंदुरबार पॅटर्न म्हणून ओळखला जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com