बस व मोटरसायकलच्या अपघातात एक ठार, दोन जखमी

नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील घटना
बस व मोटरसायकलच्या अपघातात एक ठार, दोन जखमी

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

नवापूर-पिंपळनेर Navapur-Pimpalner रस्त्यावर गुजरात राज्य परिवहन मंडळाची बस आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

आज सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान नवापूर पिंपळनेर रोडवरील घोडजामन्या गावाजवळ मालेगाव-सुरत ही गुजरात राज्याची बस ओव्हरटेक करण्याचा नादात मोटरसायकल Motorcycle (क्र.एम.एच.३९-ए.जी.७०६३) ला धडक दिल्याने मोटरसायकल Motorcycle रस्त्याचा कडेला फेकली गेली.

दुर्दैवाने तिघे मोटरसायकलस्वार मोटरसायकलीखाली दाबले गेले तर बस येऊन आदळल्याने चाकाखाली मोटरसायकल Motorcycle आणि मोटरसायकलीखाली तिघे दाबले गेल्याने कोट्या मौल्या मावची यांचा जागीच मृत्यू झाला. विक्रम मावची त्यांच्यासोबत असलेले विजेंद्र दिलीप गामीत (रा.जुनागाम ता.सोनगड गुजरात) हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत आणि जखमींना बाहेर काढत उपजिल्हारुग्णलयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जख्मींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, उपनिरीक्षक अशोक मोकळ, नासिर पठाण, पोहेकॉ गुमान पाडवी, जगदीश सोनवणे, दिंगबर पाठक, अलताफ शेख यांनी पंचनामा केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com