नंदुरबार। प्रतिनिधी- Nandurbar

नवापूर तालुक्यातील मजूर रेल्वे मजूरीसाठी घेवून जाणार्या अॅपेरीक्षा पलटी झाल्याने एक ठार 9 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाविरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष वसावे हा त्याच्या ताब्यातील अॅपेरीक्षा (क्र.एम.एच.39- जे.1198) हिच्यावर नवापूर तालुक्यातील सोनार्या दिगर येथून रेल्वे मजूरी कामासाठी मजूर चौपाळे (ता.नंदुरबार) येथे घेवून जात असतांना त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव चालत असतांना झापलीपाडा फाटयाजवळ अॅपेरीक्षा पलटी झाली.

या अपघातात गिरीश किरण वळवी (30) रा.सोनारेदिगर (ता.नवापूर) याच्या मृत्यू झाला तर सतिष शान्तु गावीत, अरविंद्र गेमा वळवी, महेंद्र रेमा वळवी, रणजित विरजी वसावे, दयाराम जेठा गावीत, सुरेंद्र जेठा गावीत, नरेश परशुराम वसावे, आशिष आनंद वसावे, मनोज रमेश पाडवी, रोहिदास रविंद्र गावीत सर्व रा. सोनारेदिगर ता.नवापूर यांना दुखापत झाली.

जखमी झालेल्या रूग्णांना जिल्हा रूग्णालय नंदुरबार येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी रोहिदास रविंद्र गावीत याच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात चालक आशिष आनंद वसावे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ अरूण कोकणी करीत आहेत.