नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

शहादा तालुक्यातील जावदा-भमराटा रस्त्यावर लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतूस बाळगणार्या एका इसमास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.२० च्या सुमारास भरत आपसिंग पावरा (रा.तितरी ता.शहादा) याच्याकडे २५ हजार रुपये किमतीची विना परवाना लोखंडी बनावटीची गावठी पिस्तुल व एक हजार रुपये किमतीच्या दोन पितळी जिवंत काडतूस आढळून आला.

त्याला जावदा त.ह.-भमराटा रस्त्यावर अटक करण्यात आली आहे. याबाबत पोना जितेंद्र अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भरत पावरा याच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देविदास सोनवणे करीत आहेत.