नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नवापूर येथील आणखी ९ पोल्ट्रीफार्ममधील पक्षांचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकुण १६ पोल्ट्रीफार्म बाधीत झाले आहेत.

आतापर्यंत ४ लाख ९० हजार ४८५ पक्षी बाधीत झाले आहेत. यापैकी २ लाख ३१ हजार ९०३ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. २ लाख ५८ हजार ५८२ पक्षी अद्याप शिल्लक आहेत.

दरम्यान, आज दि.१० फेब्रुवारी रोजी पुन्हा नऊ पोल्ट्रीफार्ममधील पक्षांचे बर्ड फ्लूचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात मुत्जबा पोल्ट्रीफार्म (पिंपळनेररोड, नवापूर), सेफ पोल्ट्रीफार्म, श्रेयस पोल्ट्रीफार्म,मुज्तबा पोल्ट्रीफार्म (लहान चिंचपाडा), न्यू शांती पोल्ट्रीफार्म, एफ सन्स पोल्ट्रीफार्म, शाहिन पोल्ट्रीफार्म,, जास पोल्ट्रीफार्म यांचा समावेश आहे.

आता या नऊबाधीत पोल्ट्रीफार्ममधील पक्ष्यांचे कलींगचे कामही सुरु करण्यात येणार आहे. नवापूर नगरपालिका क्षेत्रात २७ पोल्ट्रीफार्म असून त्यापैकी १६ पोल्ट्रीफार्म बाधीत झाले आहेत. ग्रामीण भागात ७ पोल्ट्रीफार्म आहेत.